जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp चं भन्नाट फीचर, आता तुमच्या फोटोचंही बनवता येणार Sticker

WhatsApp चं भन्नाट फीचर, आता तुमच्या फोटोचंही बनवता येणार Sticker

यासाठी WhatsApp ची Read receipts Setting बदलावी लागेल. त्यासाठी Setting मध्ये Account आणि Privacy ऑप्शनवर क्लिक करा.

यासाठी WhatsApp ची Read receipts Setting बदलावी लागेल. त्यासाठी Setting मध्ये Account आणि Privacy ऑप्शनवर क्लिक करा.

WhatsApp लवकरच एक नवं फीचर लाँच करणार आहे. या फीचरद्वारे युजर्स आपले फोटो स्टिकर्स (Whatsapp Stickers) रुपात बदलू शकतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : WhatsApp लवकरच एक नवं फीचर लाँच करणार आहे. या फीचरद्वारे युजर्स आपले फोटो स्टिकर्स (Whatsapp Stickers) रुपात बदलू शकतात. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप सध्या या फीचरवर काम करत आहे. हे नवं फीचर बीटा वर्जनमध्ये सपोर्ट करण्यात आलं आहे. हे WhatsApp Feature iOS आणि Android दोन्ही युजर्ससाठी तयार करण्याचा प्रयत्न आहे. Webtainfo च्या रिपोर्टनुसार, सध्या व्हॉट्सअ‍ॅप आपल्या अशा फीचरवर काम करत आहे, ज्याअंतर्गत सर्व युजर्स आपले फोटो स्टिकर्स रुपात बदलू शकतील. व्हॉट्सअ‍ॅप फीचर ट्रॅकर्सनुसार, ज्यावेळी हे फीचर उपलब्ध होईल, त्यावेळी कॅप्शनजवळ एक स्टिकर आयकॉनही दिसेल. व्हॉट्सअ‍ॅप क्रॅकर्सद्वारा एक स्क्रिनशॉट शेअर करण्यात आला आहे. आपले फोटो स्टिकर्समध्ये बदलण्यासाठी डायलॉग बॉक्समध्ये एक स्पेशल ऑप्शन दिला जाईल. ज्यावेळी युजर एक फोटो सिलेक्ट करेल आणि त्याच्या ऑप्शनवर क्लिक करेल, त्यावेळी फोटो आपोआप स्टिकरमध्ये बदलला जाईल. Webtainfo नुसार, व्हॉट्सअ‍ॅपने फोटोला स्टिकर बनवणाऱ्या या फीचरला बनवण्यासाठी थर्ड पार्टी अ‍ॅपचा वापर केला आहे.

आता WhatsApp वरच तपासा Bank Balance, जाणून घ्या सोपी प्रोसेस

हे फीचर बीटावर दिसत नाही. त्यामुळे हे फीचर अद्यापही टेस्ट केलं जात असल्याचं समजतं. WhatsApp ने अद्यापही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे हे फीचर कधी लाँच केलं जाईल, याबाबत कोणतीही माहिती नाही.

WhatsApp युजर्ससाठी धोक्याचा इशारा, अधिक फीचरच्या नादात वाढतील समस्या

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅप मल्टी डिव्हाईस सपोर्ट फीचरवरही काम करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप multi device support उपलब्ध करण्याचीही योजना आखत आहे. काही व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला हा पॉप-अप उपलब्ध झाला आहे. कंपनीकडून अशा शक्यतेवरही काम केलं जात आहे, ज्यात नॉन-बीटा युजर्सही या फीचरचा वापर करू शकतील. हे फीचर एकदा रोलआउट झाल्यानंतर सर्व युजर्स त्यांच्या फोनसह चार वेगवेगळ्या डिव्हाईसवर हे मेसेज फीचर उपलब्ध होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात