मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp वर चुकून दुसऱ्यालाच सेंड झाला मेसेज? टाईम लिमिट संपल्यानंतरही असा करा डिलीट, वाचा सोपी ट्रिक

WhatsApp वर चुकून दुसऱ्यालाच सेंड झाला मेसेज? टाईम लिमिट संपल्यानंतरही असा करा डिलीट, वाचा सोपी ट्रिक

WhatsApp च्या फीचरनुसार पाठवलेला मेसेज परत डिलीटही करता येतो. त्यामुळे सेंड केलेला मेसेज पाठवलेल्या व्यक्तीला दिसत नाही. पण एकदा टाईम लिमिट संपलं, की पाठवलेला मेसेज समोरचा व्यक्ती वाचू शकतो. पण एका ट्रिकद्वारे यापासून वाचता येऊ शकतं.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. कंपनी युजर्ससाठी विविध फीचर्स लाँच करत असते. व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक ग्रुप्स, मेसेजेस असतात. चुकून कधीतरी एकाला पाठवायचा मेसेज दुसऱ्या व्यक्तीला सेंड होतो. व्हॉट्सअ‍ॅपच्या फीचरनुसार पाठवलेला मेसेज परत डिलीटही करता येतो. त्यामुळे सेंड केलेला मेसेज पाठवलेल्या व्यक्तीला दिसत नाही. पण एकदा टाईम लिमिट संपलं, की पाठवलेला मेसेज समोरचा व्यक्ती वाचू शकतो. पण एका ट्रिकद्वारे यापासून वाचता येऊ शकतं.

चुकून सेंड झालेला मेसेज डिलीट करण्याचं टाईम लिमिट एका तासापर्यंत असतं. परंतु त्यानंतरही एका ट्रिकद्वारे एक तासानंतरही मेसेज डिलीट करता येऊ शकतो.

- सर्वात आधी फोन फ्लाईट मोडवर टाकावा लागेल.

- त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप आयकॉनवर लाँग प्रेस करा. इथे अनेक पर्याय दिसतील.

- त्यापैकी App Info वर जावं लागेल. इथे फोर्स स्टॉप किंवा फोर्स क्लोजवर क्लिक करावं लागेल.

WhatsApp युजर्ससाठी धोक्याचा इशारा, अधिक फीचरच्या नादात वाढतील समस्या

- त्यानंतर फोनची वेळ आणि तारीख बदलावी लागेल.

- समजा, मेसेज 9 वाजता पाठवला असेल, तर तुमच्या फोनमध्ये 8 ते 9 वाजेपर्यंतचा टाईम सेट करावा लागेल.

क्या बात है! WhatsApp कडून यूजर्सना मोठं गिफ्ट; लाँच होणार 'हे' 6 भन्नाट फीचर्स

- त्यानंतर WhatsApp ओपन करुन, मेसेज डिलीट करायचा असल्यास, Delete For Everyone करावं लागेल. यानंतर फोनची वेळ पुन्हा योग्यरित्या सेट करा आणि फ्लाईट मोडही हटवा.

दरम्यान, WhatsApp वर लवकरच इन्स्टाग्रामसारखे मेसेज रिअ‍ॅक्शन फीचर (Message Reaction Feature) मिळणार आहे. WABetaInfo च्या म्हणण्यानुसार, कंपनी अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हींसाठी या फीचरवर काम करत आहे. या फीचरद्वारे युझर्स मेसेजवर रिअ‍ॅक्शन इमोजीद्वारे आपल्या प्रतिक्रिया देऊ शकतील. मेसेजच्या खाली इमोजींची यादी दिसेल. ही सुविधा ग्रुप चॅट आणि पर्सनल चॅट दोन्हीसाठी मिळणार आहे. मात्र यासाठी व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करणं आवश्यक आहे.

First published:
top videos

    Tags: Tech news, WhatsApp features, WhatsApp user