• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • नवं फीचर! आता WhatsApp वर बिनधास्त पाठवा HD Photo, क्वॉलिटी खराब होण्याचं नो टेन्शन

नवं फीचर! आता WhatsApp वर बिनधास्त पाठवा HD Photo, क्वॉलिटी खराब होण्याचं नो टेन्शन

जर भारतातील एखाद्या 0123456789 या नंबरवर मेसेज करायचा असेल, तर xxxxxxxxxx च्या जागी +910123456789 टाईप करुन एंटर करावं लागेल.

जर भारतातील एखाद्या 0123456789 या नंबरवर मेसेज करायचा असेल, तर xxxxxxxxxx च्या जागी +910123456789 टाईप करुन एंटर करावं लागेल.

WhatsApp सध्या आणखी एका नव्या फीचरवर काम करत आहे. या फीचरमुळे हाय क्वॉलिटीमध्येही फोटो (HD Photo) सेंड केले जाऊ शकतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 18 जुलै: व्हॉट्सअ‍ॅप सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. आपली पॉप्युलॅरिटी कायम राहण्यासाठी कंपनीकडून नेहमीच विविध फीचर्स लाँच केले जातात. मिळालेल्या माहितीनुसार, WhatsApp सध्या आणखी एका नव्या फीचरवर काम करत आहे. या फीचरमुळे हाय क्वॉलिटीमध्येही फोटो (HD Photo) सेंड केले जाऊ शकतात. सध्या WhatsApp वरुन फोटो पाठवताना फोटोची क्वॉलिटी खराब होते. त्यामुळे अनेक जण फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवणं टाळताना दिसतं. आता हीच समस्या पाहता व्हॉट्सअ‍ॅप फोटोसाठीच्या फीचरवर काम करत आहे. WhatsApp HD Photos असं या फीचर नाव असेल. नावावरुनच हाय क्वॉलिटीमध्ये फोटो सेंड केले जाऊ शकतात हे समजतं. फोटोची क्वॉलिटी खराब होऊ नये यासाठी, दुसऱ्या प्लॅटफॉर्मचा आधार घेणाऱ्या युजर्ससाठी हे फीचर फायदेशीर ठरेल. हाय क्वॉलिटी फोटो पाठवण्यासाठी या फीचरचा वापर केला जाऊ शकतो. व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरबाबत WABetaInfo ने रिपोर्ट केलं आहे. WABetaInfo व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फीचर्सला ट्रॅक करतं. रिपोर्टनुसार, हे फीचर WhatsApp अँड्रॉईड बीटा वर्जन 2.21.15.5 मध्ये उपलब्ध आहे. या फीचरद्वारे युजर्स फोटो सेंड करण्याआधी त्याची क्वॉलिटी सिलेक्ट करू शकतील. यासाठी युजर्सला तीन ऑप्शन मिळतील. यात डेटा सेव्हर असा पर्याय असेल. यात फोटो अशाप्रकारे कन्प्रेस केला जाईल, की कमीत कमी जागा लागेल. या ऑप्शनमध्ये फोटो मोठ्या प्रमाणात कन्प्रेस होईल.

  (वाचा - WhatsApp युजर्सचा चॅट बॅकअप चोरी करू शकतात हॅकर्स, या फीचरने करा सिक्योर)

  या फीचरमध्ये आणखी एक चांगल्या क्वॉलिटीचा पर्याय आहे. यात HD क्वॉलिटी फोटो पाठवता येईल. यात फोटोची क्वॉलिटी तशीच ठेवण्यासाठी अधिक डेटा वापरला जाईल. फोटो अतिशय कमी कन्प्रेस केला जाईल. यात ऑप्शनमध्ये फोटोची आहे ती क्वॉलिटी 80 टक्के ठेवता येईल, असं सांगण्यात आलं आहे.

  (वाचा - तुमच्या आयुष्यातही करा या तीन Emojis चा वापर, खिशाला कधीच नाही लागणार कात्री)

  तसंच एक ऑटो ऑप्शनही युजर्सला मिळेल. यात WhatsApp आपोआप फोटोची क्वॉलिटी ठरवून फोटो कन्प्रेस करेल. असं हे फोटोसाठीचं फीचर सध्या अँड्रॉईड बीटा वर्जनमध्ये उपलब्ध आहेत. सर्व युजर्ससाठी हे अपडेट होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल.
  Published by:Karishma
  First published: