नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : WhatsApp ने भारतात काही दिवसांपूर्वी WhatsApp Payment सर्विस लाँच केली. आता कंपनी दुसऱ्या देशातही पियर-टू-पियर पेमेंट सिस्टम लाँच करण्याच्या तयारीत आहे. XDA Developers च्या नव्या रिपोर्टनुसार, लेटेस्ट WhatsApp 2.21.23.10 बीटा वर्जनमध्ये एक कोड नोवी इंटिग्रेशन (Novi integration) असून तो ग्लोबल पेमेंट ट्रान्सफरला सक्षम करण्याचं काम करतो आहे.
नोवी (Novi) सर्विस सध्या केवळ यूएस आणि Guatemala मध्ये उपलब्ध आहे. त्यामुळेच WhatsApp आता यूएस युजर्ससाठीही पेमेंट ऑप्शन जोडण्यावर काम करत आहे. WhatsApp आतापर्यंत केवळ भारतात आणि ब्राझीलमध्येच आपली पेमेंट सर्विस ऑफर करत आहे. भारतात ही सर्विस यूनिफाइड पेमेंट इंटरफेस UPI वर आधारित आहे. यामुळे युजर डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतात. आता ग्लोबली ही सर्विस सुरू होण्याबाबत बोललं जात आहे.
WABetaInfo रिपोर्टनुसार, नोवी सर्विसच्या इंटिग्रेशनबाबत सांगण्यात आलं आहे. नोवी हे एक डिजीटल वॉलेट आहे. हे वॉलेट मेटाचं (Meta) आहे. फेसबुकचं नाव बदलून मेटा करण्यात आलं आहे. त्यामुळे हे एक डिजीटल वॉलेट फेसबुकचं असून ते WhatsApp मध्ये इंटिग्रेट करण्याची योजना आहे.
Novi Service द्वारे वेगवेगळ्या देशातील युजर्स एकमेकांना पैसे पाठवू शकतात आणि मिळवूही शकतात. यासाठी कोणताही अतिरिक्त चार्ज घेतला जात नाही. परंतु पैसे पाठवण्यासाठी पॅक्स डॉलरचा (Pax Dollar) वापर करावा लागतो, जो US Dollar चा एक डिजीटल कॉइन आहे. नोवीद्वारे पैसे पाठवण्यासाठी युजरला आपले डॉक्युमेंट्स अपडेट करुन वेरिफाय करावे लागतील. यासाठी एक व्हिडीओ सेल्फीही मागितला जाऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, Whatsapp, Whatsapp pay