नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) आहे. WhatsApp सातत्याने युजर्ससाठी नवनवे फीचर्स (Features) लॉंच करत असतं. नुकतंच व्हॉट्सॲपने मल्टी-डिव्हाइस फीचर (Multi -Device Feature) लॉंच केलं आहे. हे फीचर विशेष चर्चेत आहे. हे फीचर बीटा व्हर्जनमध्ये (Beta Version) देण्यात येत आहे. व्हॉट्सॲपने Multi -Device Feature लॉंच केलं आहे. या फीचरच्या मदतीने ज्या फोनवर WhatsApp डाउनलोड केलेलं आहे, त्या फोनचा वापर न करता युजर्सला ब्राउजरवर (Browser) WhatsApp वापरता येणार आहे. फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन बंद असतानाही युजर्सला या फीचरच्या मदतीने WhatsApp वापरता येणार आहे. या फीचरच्या माध्यमातून तुम्हाला चार डिव्हाईसवर WhatsApp वापरता येईल. जर तुम्ही एकाच डिव्हाईसवरील चार वेगवेगळ्या ब्राउजर्सवर WhatsApp सुरू केलं, तर ती मल्टिपल एन्ट्री गृहीत धरण्यात येणार आहे. तुम्ही एकाच लॅपटॉपवरील 4 वेगवेगळ्या ब्राउजरवर WhatsApp अकाउंट सुरू केलं असेल तर अशावेळी दुसऱ्या डिव्हाईस किंवा ब्राउजरवर तुम्हाला WhatsApp वापरता येणार नाही.
Gmail चे हे भन्नाट फीचर्स माहित आहेत का? या सुविधांसह मेल पाठवणं होईल अगदी सोपं
व्हॉट्सॲपनं हे फीचर सध्या बीटा व्हर्जनसाठी रोलआऊट केलं आहे. त्यामुळे युजर्सला यात काही कमतरता जाणवू शकतात. कंपनीने हे फीचर टॅबलेटसाठीही (Tablets) रोलआऊट केलं आहे. परंतु, त्यावर नव्या फीचरचं सर्वोत्तम व्हर्जन ऑफर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे या मल्टी-डिव्हाइस फीचर्सचा उत्तम अनुभव युजर्सला सध्या केवळ लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरच घेता येणार आहे. WhatsApp वेब मल्टी-डिव्हाइस फीचरच्या मदतीने मेन फोन कनेक्ट न करता चार वेगवेगळ्या डिव्हाईसवर WhatsApp वापरणं शक्य होणार आहे. याचाच अर्थ असा की तुमचा फोन बंद असला किंवा फोनचं इंटरनेट कनेक्शन बंद असलं तरी देखील तुम्हाला व्हॉट्सॲपचा वापरता येईल. व्हॉट्सॲपने हे फीचर Android सह iOS साठीही रोलआऊट केलं आहे. परंतु, या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमवर हे फीचर काहीशा वेगळ्या पध्दतीने काम करतं.
PHOTO: धुळ्यातील व्यक्तीच्या खिशातच फुटला OnePlus Nord 2, झाली भयंकर अवस्था
WhatsApp Web साठी असलेल्या या फीचरमध्ये व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग (Voice And Video Calling) सपोर्ट देण्यात आलेला नाही. त्यामुळे मित्र किंवा कुटुंबियांशी संवाद साधण्याकरता व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी तुम्हाला फोनवरील WhatsApp अॅपचा वापर करावा लागणार आहे.