• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • आता WhatsApp आणखी सुरक्षित होणार, मिळणार दोन नवे फीचर्स

आता WhatsApp आणखी सुरक्षित होणार, मिळणार दोन नवे फीचर्स

व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सची आवड आणि त्यांची सुरक्षा लक्षात घेता दोन नवीन फीचर्स आणले आहेत. ज्यात Message Level Reporting आणि Flash Calls चा समावेश आहे. यामुळे युजर्सला WhatsApp वापरणं सोपं आणि सेफ होणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : कोट्यवधी भारतीय सध्या मेसेजिंगसाठी WhatsApp चा वापर करतात. त्याचा वापर आणखी चांगल्या पद्धतीने करता यावा यासाठी WhatsApp विविध नवीन फीचर्स (Whatsapp new update 2021) आणत असतं. आता व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सची आवड आणि त्यांची सुरक्षा लक्षात घेता दोन नवीन (Whatsapp new features) फीचर्स आणले आहेत. ज्यात Message Level Reporting आणि Flash Calls चा समावेश आहे. यामुळे युजर्सला WhatsApp वापरणं सोपं आणि सेफ होणार आहे. काय आहेत फीचर्स? आता व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला Message Level Reporting या फीचर्सचा वापर करून एखाद्या आक्षेपार्ह मेसेजला रिपोर्ट करता येणार आहे. युजर्सला ब्लॉक फीचरनंतर हा पर्याय (Whatsapp message level reporting features) देण्यात आला आहे. त्याचबरोबर या फीचर्सचा वापर हा स्पॅम मॅसेज, Targeted Harassment, आक्षेपार्ह मॅसेजेसविरोधात रिपोर्ट करताना फायदेशीर ठरणार आहे.

  WhatsApp वरील या Fraud मुळे होऊ शकतं तुमचं अकाउंट रिकामं; अशी घ्या काळजी

  व्हॉट्सअ‍ॅपने जारी केलेल्या एका रिपोर्टनुसार, सप्टेंबर महिन्यात असे मेसेज पाठवणाऱ्या 22 लाख अकाउंट्सवर बॅन लावण्यात आला आहे. याबरोबरच Flash Calls या फीचरमुळे व्हॉट्सअ‍ॅपला (Whatsapp flash call feature) इन्स्टॉल करताना किंवा लॉगइन करताना येणाऱ्या SMS शिवाय Automated call ने ही व्हेरिफाय करता येईल. हे फीचर अनेक Apps मध्ये याआधीच देण्यात आलेलं असून ते आता नव्याने WhatsApp मध्ये देण्यात आलेलं आहे. WhatsApp ने आतापर्यंत लॉन्च केलेले फीचर्स - व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्ससाठी मेसेजिंगचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी डिलीट झालेले मेसेज परत मिळवणं आणि प्रायव्हेट मेसेजेसला लपवण्याची सुविधा दिलेली होती. त्यानंतर आता हे दोन फीचर्स व्हॉट्सअ‍ॅपकडून जारी करण्यात आले आहेत.

  तुमचं Google Account सुरक्षित आहे का? नवीन अपडेटसाठी फॉलो करा या स्टेप्स

  दरम्यान काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या बीटा यूजर्ससाठी (Whatsapp beta version features) एक नवं अपडेट जारी केलं होतं. ज्यात युजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅप आयकॉन बदलण्यात येणार आहे. आता बीटा युजर्ससाठी नवा शॉर्टकट (Whatsapp icon change)  देण्यात आला असून तो व्हॉट्सअ‍ॅप 2.21.24.6 व्हर्जनवर काम करेल. त्याचबरोबर आता WhatsApp वर Video Call करणंही सोपं झालं आहे.
  Published by:Atik Shaikh
  First published: