मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsApp वरील या Fraud मुळे होऊ शकतं तुमचं अकाउंट रिकामं; त्यासाठी अशी घ्या काळजी

WhatsApp वरील या Fraud मुळे होऊ शकतं तुमचं अकाउंट रिकामं; त्यासाठी अशी घ्या काळजी

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर देशात सतत वाढत आहे. त्यामुळं त्यात व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्सचं फीचर्सदेखील देण्यात येत आहे. WhatsApp च्या वाढत्या वापरामुळं आता युजर्सला अनेकदा हॅकिंग आणि सायबर क्राइमचं शिकार व्हावं लागत आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर देशात सतत वाढत आहे. त्यामुळं त्यात व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्सचं फीचर्सदेखील देण्यात येत आहे. WhatsApp च्या वाढत्या वापरामुळं आता युजर्सला अनेकदा हॅकिंग आणि सायबर क्राइमचं शिकार व्हावं लागत आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर देशात सतत वाढत आहे. त्यामुळं त्यात व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्सचं फीचर्सदेखील देण्यात येत आहे. WhatsApp च्या वाढत्या वापरामुळं आता युजर्सला अनेकदा हॅकिंग आणि सायबर क्राइमचं शिकार व्हावं लागत आहे.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : व्हॉट्सअ‍ॅपचा (WhatsApp) वापर देशात सतत वाढत आहे. त्यामुळं त्यात व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्सचं फीचर्सदेखील देण्यात येत आहे. WhatsApp च्या वाढत्या वापरामुळं आता युजर्स अनेकदा हॅकिंग आणि सायबर क्राइमला बळी पडत आहेत. अनेकदा व्हॉट्सअ‍ॅपवर हॅकर्स मित्र किंवा नातेवाईकांचं नाव घेऊन आर्थिक (fraud on WhatsApp) फसवणूक करतात. त्यामुळंच आता इंग्लंडमधील Suffolk Trading Standards ने युजर्सला याविषयी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर होत असलेल्या गैरप्रकारांबाबत युजर्सला कोणती काळजी घ्यायला हवी, याविषयी माहिती जाणून घेऊयात.

मागे काही दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये एका महिलेला अनोळखी नंबरवरून एक फोन आला होता. त्यात हॅकर्सद्वारे 'मी तुमची मुलगी बोलत आहे. मला काही पैशांची गरज आहे.' असं बोलून काही व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्सच्या माध्यमातून काही पैशांची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:च्या मुलीला फोन केला तेव्हा असं काही घडलेलंच (whatsapp spam messages from Hackers) नव्हतं. तेव्हा हा फ्रॉड असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

iOS नंतर आता अँड्रॉइड युजर्ससाठी खूशखबर! Twitter वर मिळेल पैसे कमावण्याची संधी

त्यामुळं आता व्हॉट्सअ‍ॅपवर होणाऱ्या या गैरप्रकारांबाबत Suffolk County Council ने काही माहिती दिली आहे. त्यात दरवर्षी इंग्लंडमध्ये अशा सायबर क्राइममधून लोकांना 5 बिलियन पाउंड पासून तर 10 बिलियन पाउंड पर्यंतचं नुकसान होत आहे. त्यामुळं आता युजर्सला याबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

Fraud कसा ओळखाल?

अनेकदा अशा प्रकरणांमध्ये हॅकर्सकडून मित्र किंवा नातेवाईक असल्याचा बनाव करण्यात येतो. त्यामुळं आधी आपल्या आप्तेष्टांना याबाबत विचारणा करायला हवी. अनेकदा हॅकर्स कॉलवर Financial Details माहिती करण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी कोणत्याही अनोळखी नंबर्सवर कोणतीही गोपनीय माहिती शेयर करू नका.

Smartphoneमधील Photos आणि Videos चुकून झाले डिलीट; या स्टेप्स वापरून करा रिकव्हर

फसवणूकीपासून बचावासाठी अशी घ्या काळजी

हॅकर्सकडून पैशांची मागणी होत असताना ते विविध माहिती फिरून फिरून विचारतात. त्याला उत्तर देऊ नका. थोडा जरी संशय आला तरी फोन कट करा. अनोळखी कॉल्सवर कधीही आपल्या बँक अकाउंटसंदर्भात कोणतीही माहिती शेयर करू नका. कारण बँक कधीही कोणत्या खातेदाराला त्याच्या (how can i stop my whatsapp being hacked) अकाउंट्सबद्दल फोनवर माहिती विचारत नाही.

आता Google Pay वर आवाजाद्वारेही करता येईल Transaction; हे आहे भन्नाट फीचर्स

जर तुम्हाला सायबर क्राइमबद्दल काही माहिती मिळाली तर त्याला लगेचच रिपोर्ट करायला हवं. त्यासाठी सेटिंगमध्ये जाऊन Help च्या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर Contact US ला प्रेस करून त्यावर तक्रार करता येऊ शकते.

First published:

Tags: Whatsapp alert, WhatsApp features, Whatsapp pay