• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • तुमचं Google Account सुरक्षित आहे का? नवीन अपडेटसाठी फॉलो करा या स्टेप्स

तुमचं Google Account सुरक्षित आहे का? नवीन अपडेटसाठी फॉलो करा या स्टेप्स

नवीन सुरक्षा फीचरमध्ये Google ने टू-फॅक्टर व्हेरिफिकेशन सुरक्षा प्रणाली सादर केली आहे. टू-फॅक्टर व्हेरिफिकेशनमुळे युजर्सना त्यांचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड तसेच मोबाइल आणि ई-मेलवर सुरक्षा कोड मिळेल, जो प्रविष्ट केल्यानंतरच लॉग इन केल्यानंतर त्यांना गूगल अकाउंटचा वापरता येईल.

 • Share this:
  मुंबई, 21 नोव्हेंबर: गूगल (Google) माहित नाही किंवा गूगलचा वापर करत नाही अशा क्वचितच काही व्यक्ती असतील. दरम्यान गूगलचा वाढता वापर आणि त्यावर उपलब्ध असणारी असंख्य सोअर्सेसवरील माहिती लक्षात घेता तुमच्या गूगल अकाउंटची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे. या सुरक्षेसाठी गूगलकडून (Google New Update) वेळोवेळी अपडेट जारी केले जातात. गूगलने नवीन सिक्योरिटी अपडेट आणले आहे. यामुळे तुम्ही पासवर्ड हॅक होण्यापासून वाचू  शकता. गूगलआधी फेसबुक आणि ट्विटर अकाउंट्ससाठी देखील टू-फॅक्टर व्हेरिफिकेशन जारी करण्यात आले आहे. लॉग इन करताना फॉलो करा या स्टेप्स गुगलच्या नवीन सिक्युरिटी अपडेटमुळे युजर्सची वैयक्तिक माहिती (Users Personal Information) पूर्णपणे सुरक्षित होणार आहे. या सुरक्षेमध्ये कोणतेही हॅकर्स लुडबूड करू शकत नाहीत, असा दावा गुगलने केला आहे. गुगलने 9 नोव्हेंबरपासून नवीन सुरक्षा अपडेट जारी केले. या सुरक्षेनंतर, तुम्हाला गुगल अकाउंटमध्ये लॉग इन करण्यासाठी टू-स्पॅट व्हेरिफिकेशन (2 स्टेप ऑथेंटिकेशन) वापरावे लागेल. टू स्टेप व्हेरिफिकेशनसाठी अप्लाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यात लॉग इन करण्यासाठी दोन टप्पे पार करावे लागतील. नवीन सुरक्षा फीचरमध्ये Google ने टू-फॅक्टर व्हेरिफिकेशन सुरक्षा प्रणाली सादर केली आहे. टू-फॅक्टर व्हेरिफिकेशनमुळे युजर्सना त्यांचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड तसेच मोबाइल आणि ई-मेलवर सुरक्षा कोड (OTP) मिळेल, जो प्रविष्ट केल्यानंतरच लॉग इन केल्यानंतर त्यांना गूगल अकाउंटचा वापरता येईल. हे वाचा-iOS नंतर आता अँड्रॉइड युजर्ससाठी खूशखबर! Twitter वर मिळेल पैसे कमावण्याची संधी गुगल क्रोम ब्राउझरसाठी (Security Feature on Google Chrome) सुरक्षा फीचर खात्याचा पासवर्ड किती सुरक्षित आहे हे देखील सांगू शकते. युजरने सेट केलेला पासवर्ड किती वेळा वापरला आहे हे देखील कळू शकते. तुमचा पासवर्ड हॅक झाला आहे का हे देखील या फीचर अंतर्गत समजू शकते. हे वाचा-बाईकला चार्ज करताना प्रॉब्लेम येतोय? या टिप्स वापरा, होईल झटपट स्‍टार्ट फेसबुकमध्येही नवीन फीचर फेसबुकने अॅपमध्ये एक नवीन फीचर जोडले होते, ते क्वाइट मोड म्हणून ओळखले जाते. या फीचरची खासियत म्हणजे याद्वारे युजर्स त्यांचा वेळ सहज मॅनेज करू शकतात. या फीचरचा वापर करून युजर्स फेसबुकच्या सर्व नोटिफिकेशन्स एकाच वेळी म्यूट करू शकतात. जेव्हा हे फीचर एनेबल केले जाते त्यावेळी फेसबुकवर जे पुश नोटिफिकेशन येतात ते म्यूट होतात. युजर्स हवं तर वेळ शेड्यूल देखील करू शकतात की त्यांना कधीपर्यंत Facebook Quiet Mode फीचर सुरू ठेवायचे आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: