मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp चं नवं फीचर, आता Chat Backup ही होणार End-to-end Encrypted; असं करा अ‍ॅक्टिवेट

WhatsApp चं नवं फीचर, आता Chat Backup ही होणार End-to-end Encrypted; असं करा अ‍ॅक्टिवेट

आधी केवळ WhatsApp Chat एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड होते. मात्र आता WhatsApp Backup देखील एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड होईल.

आधी केवळ WhatsApp Chat एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड होते. मात्र आता WhatsApp Backup देखील एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड होईल.

आधी केवळ WhatsApp Chat एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड होते. मात्र आता WhatsApp Backup देखील एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड होईल.

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : WhatsApp ने चॅट एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह क्लाउड स्टोरेजवर सेव्ह करण्याचं फीचर रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. हे फीचर कंपनीने ग्लोबली iOS आणि Android युजर्ससाठी रोलआउट केलं आहे. WhatsApp अनेक दिवसांपासून यावर काम करत होतं. या फीचरमुळे युजर्सला आपली Chat History क्लाउड स्टोरेजमध्ये सेव्ह करण्याचा ऑप्शन मिळेल आणि प्रायव्हसीही कायम राखता येईल. आधी केवळ WhatsApp Chat एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड होते. मात्र आता WhatsApp Backup देखील एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड होईल.

हे फीचर हळू-हळू जगभरात रोलआउट होत आहे. यादरम्यान कंपनी युजर्सचा अनुभवही मॉनिटर करत आहे, जेणेकरुन एखाद्याला काही समस्या असल्यास, ती दूर करता येईल. त्यानंतर कंपनी हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध करेल.

हे फीचर यासाठीही खास आहे, कारण जर एखाद्या युजरचा फोन हरवला, तर तो दुसऱ्या फोनमध्ये लॉगइन करुन जुनी चॅट हिस्ट्री पाहू शकतो.

WhatsApp Users साठी Bad News; आता Chat Backup साठी येऊ शकते ही समस्या

End-to-end-encryption चा वापर करुन बॅकअपच्या सुरक्षेसाठी एक वैयक्तिक पासवर्ड किंवा 64-बीट एन्क्रिप्शन Key निवडता येते. जर पासवर्ड विसरलात, तर WhatsApp तुमच्या चॅट हिस्ट्रीला एन्क्रिप्टेड बॅकअपमधून रिस्टोर करण्यासाठी तुमची मदत करू शकत नाही. त्यामुळे पासवर्ड लक्षात ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे.

Googleने बॅन केले Login-IDचोरी करणारे Apps,लगेच डिलीट करुन बदलाFacebook Password

End-to-end-encryption कसं ऑन कराल?

सर्वात आधी WhatsApp चं लेटेस्ट वर्जन तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करावं लागेल. त्यानंतर काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. स्टेप्सनुसार, तुमच्या फोनमध्ये बॅकअप सुविधा उपलब्ध होत नसेल, तर काही दिवस वाट पाहावी लागेल.

सर्वात आधी WhatsApp Setting मध्ये जावं लागेल, ज्यात चॅट सेक्शनमध्ये चॅट बॅकअप पर्याय निवडा आणि त्यानंतर End-to-end Encrypted Backup सेटिंग ऑन करा. WhatsApp Settings > Chats > Chat Backup > End-to-end Encrypted Backup.

त्यानंतर पासवर्ड सेट करण्यासाठी सांगितलं जाईल. इथे 64 डिजीट encryption key ऑटोमेटिकली सेट करू शकता. यानंतर तुमच्या फोनवर बॅकअप प्रोसेस सुरू होईल.

First published:

Tags: Tech news, Whatsapp chat, Whatsapp News