नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : Google ने नुकतेच 150 हून अधिक धोकादायक Apps बॅन केले होते. आता Google ने पुन्हा Play Store वरुन आणखी तीन धोकादायक Apps हटवले आहेत. युजर्सच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे बॅन लावण्यात आलं आहे. जर तुमच्याही फोनमध्ये हे Apps असतील, तर लगेच डिलीट करणं गरजेचं आहे.
Google ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या 3 बिलियन अॅक्टिव्ह अँड्रॉईड डिव्हाईस आहेत. धोकादायक Apps बॅन करुन गुगल युजर्सला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. Google ने बॅन केलेल्या या Apps द्वारे युजर्सच्या पर्सनल माहितीद्वारे बँक अकाउंटमधून चोरी केली जात होती.
सिक्योरिटी फर्मनुसार, हे Apps युजर्सचे लॉगइन आयडी चोरी करुन पर्सनल माहितीचा वापर करत होते. आता Magic Photo Lab- Photo Editor, Blender Photo Editor-Easy Photo Background Editor आणि Pix Photo Motion Edit 2021 हे Apps Google ने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन बॅन केले आहेत.
एखाद्या App किंवा वेबसाइटवर लॉगइन करताना Login With Facebook या पर्यायाद्वारे युजर्स सहजपणे लॉगइन करू शकतात. यामुळे कोणताही पासवर्ड किंवा युजरनेम न टाकताच वेबसाइट किंवा App वापरता येतं. याचाच फायदा धोकादायक Apps द्वारे घेतला जातो. हे Apps युजर्सचे Login-ID चोरी करतात.
जर तुम्हीही हे Apps डाउनलोड केले असतील, तर लगेच फोनमधून डिलीट करा. त्याशिवाय तुमचे फेसबुक लॉगइन डिटेल्सही बदला.
दरम्यान, या आधीही Zimperium च्या सुरक्षा तज्ज्ञांनी धोकादायक Apps बाबत माहिती दिली होती. त्यांनी मालवेअरबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. ग्रिफ्थोर्स अँड्रॉईड ट्रोजन मालवेअरमुळे जगभरातील Android Smartphone Users चे लाखो रुपये चोरी करण्यात आल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे हे Apps तुमच्याही फोनमध्ये असल्यास ते लगेच डिलीट करणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.