जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp वर आलेल्या लिंकद्वारे तुम्हीही Pink व्हॉट्सअ‍ॅप डाउनलोड केलं का? वाचा काय आहे प्रकरण

WhatsApp वर आलेल्या लिंकद्वारे तुम्हीही Pink व्हॉट्सअ‍ॅप डाउनलोड केलं का? वाचा काय आहे प्रकरण

WhatsApp वर आलेल्या लिंकद्वारे तुम्हीही Pink व्हॉट्सअ‍ॅप डाउनलोड केलं का? वाचा काय आहे प्रकरण

व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) मागील काही दिवसांपासून एक यूआरएल लिंक (URL link) व्हायरल होत आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचं व्हॉट्सअ‍ॅप गुलाबी रंगाचं होईल आणि त्यात काही नवे फीचर्स जोडले जातील असा दावा करण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 23 एप्रिल : व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) मागील काही दिवसांपासून एक यूआरएल लिंक (URL link) व्हायरल होत आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचं व्हॉट्सअ‍ॅप गुलाबी रंगाचं होईल आणि त्यात काही नवे फीचर्स जोडले जातील असा दावा करण्यात आला आहे. परंतु ही लिंक, URL, मेसेज पूर्णपणे फ्रॉड आहे. या लिंकद्वारे हॅकर्स युजर्सचा डेटा चोरी करत असल्याचं समोर आलं आहे. खऱ्या व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच दिसतं पिंक व्हॉट्सअ‍ॅप - सायबर सिक्योरिटी रिसर्चर राजशेखर राजहारिया या फेक व्हॉट्सअ‍ॅपला रिपोर्ट करणारे पहिले युजर आहेत. त्यांनी या हॅकबाबत अनेक स्क्रिनशॉटही शेअर केले आहेत, ज्यात दाखवण्यात आलं आहे की, कशाप्रकारे मालवेअर सॉफ्टवेअरचं इंटरफेस ओरिजनल व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच आहे. या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये युजर्सची अनेक प्रकारची खासगी माहिती घेतली जाते. ज्यात युजर्सचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड डिटेल्सही असू शकतात. त्यामुळे युजर्सच्या बँक अकाउंट्सला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो.

(वाचा -  ऑनलाईन शॉपिंगच्या जाळ्यात अडकू नका, असं ओळखा प्रोडक्ट असली आहे की नकली )

असा करा बचाव - फेक आणि मालवेअर अ‍ॅप्सपासून वाचण्यासाठी युजर्सने कोणत्याही प्रकारच्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. तसंच एखाद्या अ‍ॅपची लिंक व्हॉट्सअ‍ॅप मिळाल्यास, ती गुगलवर तपासणं आवश्यक आहे.

(वाचा -  सरकारचा इशारा! तुम्हालाही हा SMS आला असल्यास, लगेच करा डिलीट,बसू शकतो मोठा फटका )

चुकून इन्स्टॉल केलं Pink WhatsApp, तर असं करा डिलीट - व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या लिंकवरुन चुकून हे व्हॉट्सअ‍ॅप इन्स्टॉल केलं असेल, तर सर्वात आधी WhatsApp Web ला लिंक केलं असेल, तर ते अनलिंक करा. त्यानंतर सेटिंगमध्ये जाऊन ब्राउजर कॅश मेमरी क्लिअर करा. ती हटवण्यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये अ‍ॅप्स सेटिंग ओपन करावी लागेल. येथे WhatsApp Pink आपल्या नावाने किंवा कोणत्याही अनोळखी नावाने असू शकतं, ते अनइन्स्टॉल करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात