जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp वर एका सावधगिरीने टळला 90 हजारांचा Fraud, तुम्हीही या गोष्टी लक्षात ठेवाच

WhatsApp वर एका सावधगिरीने टळला 90 हजारांचा Fraud, तुम्हीही या गोष्टी लक्षात ठेवाच

WhatsApp वर एका सावधगिरीने टळला 90 हजारांचा Fraud, तुम्हीही या गोष्टी लक्षात ठेवाच

काही सावधगिरी बाळगून व्हॉट्सअ‍ॅप फ्रॉड (WhatsApp Fraud) पासून बचाव करता येऊ शकतो. एका व्यक्तीने WhatsApp हॅकर्सपासून (Hackers) आपले 90 हजार रुपये वाचवले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) वर फ्रॉड झाल्याच्या अनेक घटना समोर आहेत. स्कॅमर्स, हॅकर्स दररोज नव्या पद्धतींनी लोकांची फसवणूक करत आहेत. परंतु काही सावधगिरी बाळगून अशा प्रकारच्या व्हॉट्सअ‍ॅप फ्रॉड (WhatsApp Fraud) पासून बचाव करता येऊ शकतो. एका व्यक्तीने अशाच प्रकारे WhatsApp हॅकर्सपासून (Hackers) आपले 90 हजार रुपये वाचवले आहेत. रिपोर्ट्सनुसार, इंग्लंडच्या Liverpool जवळ एका मिशेल नावाच्या व्यक्तीने मोठी फसवणूक होता होता टाळली आहे. केवळ सावधगिरी बाळगल्याने त्याने 900 पाउंड भारतीय चलनानुसार जवळपास 90 हजार रुपये फ्रॉड होण्यापासून वाचवले आहेत. मिशेलला एका अनोळखी नंबरवरुन WhatsApp वर मेसेज आला. या मेसेजमध्ये स्कॅमरने तो मिशेलची मुलगी असल्याचा दावा केला. स्कॅमरने मिशेलची मुलगी असल्याचा बनाव करत WhatsApp Message केला. या मेसेजमध्ये माझा फोन हरवला आहे, त्यामुळे मी दुसऱ्या नंबरवरुन मेसेज करत असल्याचं सांगितलं. यावर मिशेलने विश्वास ठेवला आणि तो अनोळखी नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह केला. काही वेळ बोलल्यानंतर स्कॅमरने मिशेलकडे पैशांची मागणी केली. जुन्या फोनमध्ये बँकिंग अ‍ॅप्स (Banking Apps) अ‍ॅक्सेस करता येत नाहीत. परंतु एक बिल पेमेंट करायचं आहे.

हे वाचा -  ऑर्डर केलं 50,999 रुपयांचं Apple Watch, डिलीव्हर झालेल्या प्रोडक्टने युजर हैराण

आपल्याच मुलीने पैशांची मागणी केल्याचं समजून मिशेलनेही बँकिंग डिटेल्स मागितले. स्कॅमरने सांगतिलं, की ऑनलाइन पेमेंटसाठी (Online Payment) नवं अकाउंट तयार केलं आहे आणि त्या अकाउंटचे डिटेल्स शेअर केले आहेत. मिशेलला याच गोष्टीवर संशय आला आणि त्याने काही प्रश्न विचारले. मिशेलने स्कॅमरला आपल्या मुलीचं मिडिल नेम विचारलं, त्यावर स्कॅमरकडे कोणतंही उत्तर नव्हतं. काही मेसेजनंतर स्कॅमरने मिशेलला मेसेज करणं बंद केलं आणि थोडक्यात मोठी फसवणूक टाळली गेली.

हे वाचा -  मुंबईत राहणाऱ्या तरुणीच्या बाबतीत घडला विचित्र प्रकार; Whatsapp वापरत असाल तर आधी हा VIDEO पाहाच

तुम्हाला कोणी जवळचा नातेवाईक-मित्र मेसेज करुन पैशांची मागणी करत असेल, लिंकवर क्लिक करण्यास सांगत असेल. तर सावध व्हा. कारण हॅकर्स-स्कॅमर्स WhatsApp हॅक (WhatsApp Hacked) करुन आपल्याच नावाने आपल्या जवळच्यांना मेसेज करतात आणि आपल्या मित्र-कुटुंबियांनाही आपल्या मित्राने पैसे मागितल्याचं वाटतं. त्यामुळे कोणी पैशांची मागणी केल्यास त्या संबंधित व्यक्तीला थेट कॉल करा खरं-खोटं समजून घ्या. चुकूनही पर्सनल डिटेल्स, ओटीपी WhatsApp वर शेअर करू नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात