मुंबई, 21 मे : आपल्या फोनमध्ये अनेकवेळा लिंक आपल्याला येत असतात. आपण कोणताही विचार न करता त्यावर क्लीक करतो. त्यामुळे बऱ्याचदा आपल्या फोनमध्ये Virus येतो. त्यातून डेटा लीक होणं किंवा फोनमधील सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम होणं अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. दिवसागणिक अशा प्रकरणांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. WolfRAT मेलवेअर नावाचा महाभयंकर व्हायरस सध्या मेसेजिंग अॅपवर हल्ला करत असल्याची माहिती मिळत आहे. व्हॉट्सअॅप आणि फेसबुक निशाण्यावर आहेत.
या मेलवेअरच्या मदतीनं व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेंजर वापरकर्त्यांच्या फोनमधील फोटो, मेसेजेस आणि ऑडिओ रेकॉर्डिंगद्वारे प्रवेश मिळविला जात आहे. गूगल प्ले-स्टोअरवर फ्लॅश अपडेटद्वारे हे मेलवेअर फोनवर पोहोचत असल्याचा संशोधकांचा दावा आहे. या मेलवेअरद्वारे, वापरकर्त्यांचे फोन रिमोट कंट्रोलवर देखील घेता येतात, पण अद्याप या मेलवेयरद्वारे किती युझर्सना टारगेट केलं आहे याची कोणतीही माहिती समोर येऊ शकली नाही.
हे वाचा-दीड महिन्यांच्या बाळाचा वाचवण्यासाठी डॉक्टरनं स्वत:चा जीव घातला धोक्यात
हा व्हायरस इतका महाभयंकर आहे की व्हॉटसअॅपच्या सिक्युरिटीची नजर चुकवूनही फोनमध्ये शिरू शकतो. काही लिंकच्या मदतीनंही फोनमध्ये पोहोचण्याचा मार्ग निवडू शकतो. त्यामुळे मेसेजिंग अॅप वापरताना सावधान राहाणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं आहे.
हे अॅप गुगल प्ले स्टोरसोबत लिंक असल्याचा आभास ग्राहकांच्या मनात निर्माण करतं. आपल्याला समजण्याआधीच या व्हाय़रसनं आपल्या फोनमधील डेटावर हल्ला केलेला असतो. त्यामुळे कोणतंही अॅप हे गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा. येणारे अपडेट थेट प्लेस्टोरवरून करा. कोणत्याही लिंक, फोटोवर क्लीक करून करू नका. ज्यामुळे हा व्हायरस आपल्या मोबाईलमधील डेटावर हल्ला करेल. ग्राहकांनी याबाबत सतर्क राहाणं गरजेचं आहे.
हे वाचा-लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच वधू निघाली पॉझिटिव्ह, वरासह 32 जणं क्वारंटाइन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Facebook, Techonology, Whatsapp, Whatsapp alert