डॉक्टरांनी जीव घातला धोक्यात, दीड महिन्यांच्या कोरोनाग्रस्त चिमुकल्याच्या मेंदूची केली शस्त्रक्रिया

डॉक्टरांनी जीव घातला धोक्यात, दीड महिन्यांच्या कोरोनाग्रस्त चिमुकल्याच्या मेंदूची केली शस्त्रक्रिया

सायन रुग्णालयात दीड महिन्यांच्या चिमुकल्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 21 मे : देभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. दीड महिन्यांच्या चिमुकल्यापासून ते 93 वर्षांच्या आजोबांपर्यंत वयोगाटातील रुग्णांची कोरोनाशी झुंज सुरू आहे. सोशल मीडियावर सध्या एका दीड महिन्यांच्या चिमुकल्याचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. हा चिमुकला कोरोना पॉझिटिव्ह असून त्याच्या फुफ्फुसांना सूज आली होती. त्याची प्रकृती रात्री उशिरा खालवल्यामुळे डॉक्टरांना अचानक शस्त्रक्रिया करावी लागली.

सायन रुग्णालयात दीड महिन्यांच्या चिमुकल्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान रात्री उशिरा अचानक प्रकृती खालावली. या चिमुकल्याच्या फुफ्फुसाला सूज आल्यानं श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. मेंदूमध्ये रक्तस्त्रव झाला. डॉक्टरांच्या टीमनं या चिमुकल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भूल देण्याची व्यवस्था केली.

डॉक्टरांच्या 6 जणांच्या पहाटे 3 वाजता यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. 13 एप्रिल रोजी सर्दी-खोकल्या असल्यानं त्याची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या इतर चाचण्या करण्यात आल्या. त्यावेळी बाळाच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचं लक्षात आलं. तातडीनं डॉक्टरांच्या टीमनं शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि ती यशस्वी झाल्याची माहिती सायन रुग्णालयाचे डिन डॉ रमेश भारमल यांनी दिली आहे.

First published: May 21, 2020, 11:30 AM IST

ताज्या बातम्या