मध्य प्रदेशच्या राजधानीत रेड झोनमध्ये झालेल्या लग्नामुळे दोन जिल्ह्यांमध्ये खळबळ उडाली आहे. लग्नाच्या तिसर्या दिवशी वधूचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.
भोपाळ, 21 मे : देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात मध्य प्रदेशच्या राजधानीत रेड झोनमध्ये झालेल्या लग्नामुळे दोन जिल्ह्यांमध्ये खळबळ उडाली आहे. लग्नाच्या तिसर्या दिवशी वधूचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यानंतर, वरासोबत लग्नाला उपस्थित असलेल्या 32 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
रेड झोन असलेल्या भोपाळमधल्या मुलीनं ग्रीन झोन असलेल्या रायसेनमधील मुलाशी विवाह केला. मात्र नवरीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता रायसेनही रेड झोन झाला आहे. आणखी किती लोकांशी त्यांचा संपर्क आला याबद्दल चौकशी केली जात आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचे क्लस्टर ट्रान्समिशन होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.
वाचा-दीड महिन्यांच्या बाळाचा वाचवण्यासाठी डॉक्टरनं स्वत:चा जीव घातला धोक्यात
प्रकरण राजधानी भोपाळच्या जाट खेरीचे आहे. येथे राहणार्या मुलीचे सोमवारी लग्न झाले होते. मुलीला 7 दिवसांपूर्वी ताप आला होता, मात्र औषध घेतल्यानंतर तिला बरं वाटलं. मात्र, खबरदारी घेत कुटुंबीयांनी शनिवारी तिची कोरोना चाचणी केली. मात्र रिपोर्ट येण्याआधीच त्यांनी मुलीचं लग्न लावून दिलं. बुधवारी लग्नाच्या तिसर्या दिवशी तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.
वाचा-एकत्र अॅडमिट झाले पती, पत्नी आणि मुलगा; पण घरी परतली फक्त आईनवऱ्यासह 32 जण क्वारंटाइन
आता वरासह वधूच्या संपर्कात आलेल्या सासू-सासऱे आणि 32 जणांना त्वरित क्वारंटाइन करण्यात आलं आहे. लग्न लावलेले भटजीही क्वारंटाइन आहेत. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली असून एक किंवा दोन दिवसांत रिपोर्ट येण्याची शक्यता आहे.
वाचा-फक्त 'या' कारणामुळे नोव्हेंबरपर्यंत भारत होणार कोरोनामुक्त, शास्त्रज्ञांचा अंदाज
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.