नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी: गुगलमुळे (Google) व्हॉट्सअॅप युजर्सचं (WhatsApp Users) टेन्शन वाढू शकतं. एका रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅप चॅट बॅकअपसाठी (WhatsApp Chat Backup) मिळणारं अनलिमिटेड फ्री स्टोरेज (Free Storage) गुगल येणाऱ्या काही दिवसांत बंद करू शकतो. WABetaInfo ने दिलेल्या रिपोर्टनुसार, गुगल व्हॉट्सअॅप चॅट्स (WhatsApp Chats) स्टोर करण्यासाठी मिळणारा फ्री अनलिमिटेड प्लॅन बंद करण्याच्या तयारीत आहे. अनलिमिटेड प्लॅन बंद करण्यासह गुगल व्हॉट्सअॅप चॅट बॅकअपसाठी एक नवा लिमिटेड प्लॅनदेखील आणू शकतो.
हे वाचा - मुंबईतील तरुणीसोबत घडला विचित्र प्रकार;WhatsApp वापरत असाल तर आधी हा VIDEO पाहाच
WABetaInfo ने दिलेल्या रिपोर्टनुसार, गुगल ड्राइव्हवर (Google Drive) व्हॉट्सअॅप बॅकअप फ्री राहील. परंतु यासाठी युजर्सला लिमिटेड प्लॅन मिळेल. नव्या स्टोरेज प्लॅनबाबत यात कोणतीही नवी माहिती देण्यात आलेली नाही. लिमिटेड प्लॅनचं स्टोरेज संपल्यानंतर युजर्सला एक्स्ट्रा स्टोरेजसाठी काही पैसे द्यावे लागू शकतात. याबाबत अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही.
हे वाचा - Smartphone चोरी झाला?हे आहेत शोधण्यासाठीचे सोपे पर्याय;स्विच ऑफ फोनही होईल ट्रॅक
बॅकअप मॅनेज करण्यासाठी नवं येऊ शकतं नवं फीचर - New feature will be added to manage backup काही दिवसांपूर्वी आलेल्या WABetaInfo रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सला बॅकअप साइज मॅनेज करण्याची सुविधा देऊ शकतं. WABetaInfo ने बॅकअप मॅनेज करण्यासाठी व्हॉट्सअॅपमध्ये एक नवं सेक्शनही दाखवलं होतं. याच्या मदतीने युजर्स ज्या मीडिया फाइल्सचा बॅकअप घेऊ इच्छित नाहीत, तो न घेण्याचा पर्याय असेल. अशात आता गुगल व्हॉट्सअॅप चॅट बॅकअपसाठी लिमिटेड प्लॅनचा विचार करत आहे, त्यामुळे व्हॉट्सअॅपचं मॅनेज चॅट बॅकअप फीचर युजर्ससाठी फायद्याचं ठरू शकतं.
Google will offer a limited plan for WhatsApp backups!
— WABetaInfo (@WABetaInfo) January 29, 2022
WhatsApp backups will count against your Google Drive storage quota again, but Google is planning to offer a free limited plan in the future.https://t.co/6MmLXYFGzC
दरम्यान, गुगलने मागील वर्षी गुगल फोटो सेव्ह करण्यासाठी मिळणारा अनलिमिटेड स्टोरेज बंद केला होता. गुगल आणि व्हॉट्सअॅपमध्ये 2018 रोजी एक करार झाला होता. त्यानुसार, गुगल ड्राइव्हवर स्टोर होणारा व्हॉट्सअॅप बॅकअप ड्राइव्हच्या स्टोरेजमधून वापरला जाणार नाही. व्हॉट्सअॅप बॅकअप फोन नंबर आणि अशा गुगल अकाउंटशी जोडलेला असतो, ज्यावर हा क्रिएट झाला आहे. आता गुगल बॅकअपसाठी नवा प्लॅन कधी रिलीज करणार, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.