मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp ने बॅन केले 20 लाखांहून अधिक भारतीय युजर्सचे अकाउंट, तुम्हीही अशी चूक करू नका

WhatsApp ने बॅन केले 20 लाखांहून अधिक भारतीय युजर्सचे अकाउंट, तुम्हीही अशी चूक करू नका

फेसबुकच्या (Facebook) मालकीचं असलेल्या WhatsApp ने डिसेंबर महिन्यात 2,079,000 भारतीय युजर्सचे अकाउंट बॅन केले. याबाबत कंपनीने मंगळवारी रिपोर्ट जारी केला आहे.

फेसबुकच्या (Facebook) मालकीचं असलेल्या WhatsApp ने डिसेंबर महिन्यात 2,079,000 भारतीय युजर्सचे अकाउंट बॅन केले. याबाबत कंपनीने मंगळवारी रिपोर्ट जारी केला आहे.

फेसबुकच्या (Facebook) मालकीचं असलेल्या WhatsApp ने डिसेंबर महिन्यात 2,079,000 भारतीय युजर्सचे अकाउंट बॅन केले. याबाबत कंपनीने मंगळवारी रिपोर्ट जारी केला आहे.

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : इन्स्टंट मेसेजिंग App व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) डिसेंबर महिन्यात 20 लाखहून अधिक भारतीय अकाउंट बॅन (WhatsApp Account Banned) केले. याबाबत कंपनीने मंगळवारी रिपोर्ट जारी केला आहे. फेसबुकच्या (Facebook) मालकीचं असलेल्या WhatsApp ने डिसेंबर महिन्यात 2,079,000 भारतीय युजर्सचे अकाउंट बॅन केले. 2021 नव्या आयटी नियमांनुसार कंपनीला फेक अकाउंटसाठी 528 तक्रार रिपोर्ट मिळाले होते. यापैकी 24 तक्रारींवर त्याच महिन्यात अ‍ॅक्शन घेण्यात आली.

WhatsApp च्या प्रवक्त्यांनी सांगितलं, की IT नियम 2021 अंतर्गत WhatsApp ने आपला सातवा कम्प्लायेंस रिपोर्ट सादर केला. नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार, WhatsApp ने डिसेंबर महिन्यात 20 लाखांहून अधिक WhatsApp Account बॅन केले.

फेक मेसेज आणि अपशब्द -

WhatsApp कडून मिळालेल्या माहितीनुसार, डेटामध्ये दिलेल्या हायलाइट्सनुसार, भारतीय युजर्सचं अकाउंट 1 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत बॅन करण्यात आले होते. या अकाउंट्सद्वारे फेक डेटा (Fake Data) लोकांपर्यंत पोहोचवला जात होता. त्यामुळे अनेकांना फ्रॉड, फसवणुकीच्या (Fraud) समस्यांचा सामना करावा लागला.

हे वाचा - ऑर्डर केलं 50,999 रुपयांचं Apple Watch, डिलीव्हर झालेल्या प्रोडक्टने युजर हैराण

WhatsApp प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, WhatsApp स्वत: हे अकाउंट बॅन करण्यासाठी सक्षम आहे, कारण त्यांच्याकडे End-to-end encrypted मेसेजिंग सर्विसेस आहे. सतत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), प्रत्येक राज्याची टेक्नोलॉजी, डेटा सायटिस्ट आणि एक्सपर्ट्सची मदत घेऊन यावर काम केलं जातं, जेणेकरुन युजर्सला प्लॅटफॉर्मवर सुरक्षित वाटेल.

फेसबुक, इन्स्टाग्रामनेही बॅन केले फेक अकाउंट -

Meta ने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर 1 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत 534 भारतीय युजर्सकडून तक्रारी मिळाल्या होत्या. रिपोर्टनुसार, छळवणूक तसंच अपमानास्पद कंटेंट (Harassment/Abusive Content) आणि हॅक्ड अकाउंटबाबत (Hacked Account) खराब कंटेंट मिळाला होता.

हे वाचा - WhatsApp वर एका सावधगिरीने टळला 90 हजारांचा Fraud, तुम्हीही या गोष्टी लक्षात ठेवाच

भारत सरकारने मे 2021 मध्ये नवे आयटी नियम सोशल मीडिया कंपन्यांना (Social Media) रेग्युलेट करण्यासाठी आणण्यात आले होते. या नियमांनुसार सोशल मीडिया कंपन्यांना दर महिन्याला आपला रिपोर्ट सादर करावा लागतो.

First published:
top videos

    Tags: Tech news, Whatsapp messages, Whatsapp News, WhatsApp user