Home /News /technology /

WhatsApp ने बॅन केली 30 लाख अकाउंट्स, सांगितलं Ban मागचं कारण

WhatsApp ने बॅन केली 30 लाख अकाउंट्स, सांगितलं Ban मागचं कारण

व्हॉट्सअ‍ॅपने भारतात 16 जून ते 31 जुलैपर्यंत केवळ 46 दिवसांत 3,027,000 अकाउंट बॅन केली आहेत.

  नवी दिल्ली , 1 सप्टेंबर : व्हॉट्सअ‍ॅप सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आता नव्या आयटी नियमाचं पालन करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने मागील महिन्यात आपला पहिला सुरक्षा रिपोर्ट सादर केला होता. या रिपोर्टमध्ये, व्हॉट्सअ‍ॅपने 15 मे ते 15 जूनदरम्यान भारतात कमीत-कमी दोन मिलियन अकाउंट बॅन केल्याची माहिती दिली आहे. आता यासंबंधीत दुसऱ्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपने 45 दिवसांच्या आत भारतात 30 लाखहून अधिक अकाउंट बॅन केली आहेत. व्हॉट्सअ‍ॅपने भारतात 16 जून ते 31 जुलैपर्यंत केवळ 46 दिवसांत 3,027,000 अकाउंट बॅन केली आहेत. 16 जून ते 31 जुलैपर्यंत WhatsApp ने 30 लाख अकाउंट बॅन केली आहेत. रिपोर्टनुसार, एका भारतीय अकाउंटची ओळख +91 फोन नंबरद्वारे केली जाते. सर्वाधिक 95 टक्के व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बॅन होण्यामागे ऑटोमेटेड किंवा स्पॅम मेसेजिंगचा चुकीचा वापर करणं हे कारण आहे. 16 जून ते 31 जुलैदरम्यान, 594 युजर्सनी रिपोर्ट केलं आहे. त्यानुसार 74 अकाउंट्सवर कारवाई करण्यात आली आहे.

  Alert! WhatsApp वर एक चूक पडेल महागात, अकाउंट Hack होण्याचा धोका; असा करा बचाव

  WhatsApp च्या प्रवक्त्यांनी सांगितलं, की आमच्या प्लॅटफॉर्मवर युजर्सला सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा शास्त्रज्ञ,  इतर तज्ञ आणि अनेक प्रक्रियांमध्ये सतत गुंतवणूक केली आहे.

  WhatsApp वर लवकरच येणार Instagram, Messenger सारखं हे खास फीचर

  भारतात युजर्सकडून दोन प्रकारच्या तक्रारी आल्या. व्हॉट्सअ‍ॅपच्या भारतातील तक्रार अधिकाऱ्याला पाठवलेल्या ईमेलद्वारे व्हॉट्सअ‍ॅपच्या नियम-अटींचं उल्लंघन किंवा मदत केंद्रात प्रकाशित केलेल्या आणि इतर पोस्टद्वारे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटबाबतचे प्रश्न यासंबंधी ईमेल आले आहेत.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Tech news, Whatsapp alert, WhatsApp user

  पुढील बातम्या