जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp वर लवकरच येणार Instagram, Messenger सारखं हे खास फीचर, पाहा नव्या अपडेटमध्ये काय असणार

WhatsApp वर लवकरच येणार Instagram, Messenger सारखं हे खास फीचर, पाहा नव्या अपडेटमध्ये काय असणार

WhatsApp वर लवकरच येणार Instagram, Messenger सारखं हे खास फीचर, पाहा नव्या अपडेटमध्ये काय असणार

WhatsApp आता मेसेज रिअ‍ॅक्शन फीचरवर काम करत आहे. या फीचरद्वारे युजर्स चॅटमध्ये आलेल्या मेसेजवर रिअ‍ॅक्शन देऊ शकतील.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 30 ऑगस्ट : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आपल्या युजर्ससाठी लवकरच ट्विटर (Twitter), इन्स्टाग्राम (Instagram) आणि सिंगल (Signal) अ‍ॅपसारखं खास फीचर आणणार आहे. कंपनी आता मेसेज रिअ‍ॅक्शन फीचरवर काम करत आहे. या फीचरद्वारे युजर्स चॅटमध्ये आलेल्या मेसेजवर रिअ‍ॅक्शन देऊ शकतील. यामुळे चॅट एक्सपिरिअन्स अधिक मजेशीर होऊ शकेल. हे फीचर फेसबुक (Facebook) आणि त्याच्या मेसेंजर (Messenger) अ‍ॅपमध्ये आहे. सध्या हे फीचर टेस्टिंग फेजमध्ये असून लवकरच युजर्ससाठी रोलआउट केलं जाणार आहे. WhatsApp च्या लेटेस्ट अपडेटवर नजर ठेवणाऱ्या WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp ही इतर अ‍ॅप्सप्रमाणे मेसेज रिअ‍ॅक्शन फीचर आणणार आहे. हे सध्या इंटरनल टेस्टिंगचा भाग आहे, त्यामुळे बीटा युजर्ससाठीही हे फीचर उपलब्ध नाही. तसंच हे फीचर रोलआउट झाल्यानंतरही केवळ WhatsApp चं लेटेस्ट वर्जन वापरणाऱ्या युजर्ससाठी उपलब्ध असेल. जुनं वर्जन वापरणाऱ्यांना हे फीचर वापरण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करण्याचं सांगितलं जाईल.

Alert! WhatsApp वर एक चूक पडेल महागात, अकाउंट Hack होण्याचा धोका; असा करा बचाव

WABetaInfo ने याबाबत स्क्रिनशॉट पोस्ट केला आहे. ज्यात एक एरर मेसेज असून हीच या नव्या फीचरसाठीची पहिली स्टेप असू शकते असं सांगण्यात आलं आहे.

जाहिरात

हे नवं फीचर केवळ अँड्रॉईड युजर्ससाठीच नसून iPhone, वेब आणि डेस्कटॉप वर्जनवरही याचा वापर केला जाऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात