नवी दिल्ली, 10 मे: इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने
(WhatsApp) 15 मे पर्यंत प्रायव्हसी पॉलिसी (Privacy Policy) अॅक्सेप्ट केली नाही, तरीही युजर्सची कोणतीही सर्विस किंवा अकाउंट बंद किंवा डिलीट केलं जाणार नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून व्हॉट्सअॅप आपल्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे वादात आहे.
ज्या युजर्सनी 15 मे 2021 पर्यंत पॉलिसी अॅक्सेप्ट केली नाही, त्यांना WhatsApp काही आठवड्यांपर्यंत Reminders पाठवत राहील. परंतु एका कालावधीपर्यंत पॉलिसी न स्वीकारल्यास, युजर्स WhatsApp चे काही फीचर्स वापरू शकणार नाही.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, WhatsApp सुरू राहण्यासाठी युजर्सला नवी प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारावी लागेल किंवा त्यांना WhatsApp चा लिमिटेड वापर करावा लागेल. प्रायव्हसी पॉलिसी अॅक्सेप्ट केली नाही, तर कंपनी युजरचं अकाउंट डिलीट करणार नाही, पण युजर व्हॉट्सअॅपवरील सर्व फीचर्स वापरु शकणार नाही.
मर्यादित कालावधीत अटी मान्य न केल्यास, युजर्स त्यांची चॅट लिस्ट अॅक्सेस करू शकणार नाहीत. त्यांना इतर युजर्सकडून चॅट रिसिव्ह होतील, परंतु केवळ नोटिफिकेशनद्वारे ते वाचता येईल किंवा नोटिफिकेशनद्वारेच रिप्लाय करता येईल. WhatsApp काही आठवड्यांपर्यंत युजर्सला अटी मान्य करण्यासाठी रिमाइंडर पाठवत राहील, असंही सांगण्यात आलं आहे.
यापूर्वी कंपनीने या प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार न केल्यास, अकाउंट डिलीट होण्याचं सांगितलं होतं. कंपनीच्या या निर्णयावर सरकारसह अनेक युजर्सनेही नाराजी व्यक्त केली होती. आता 15 मेनंतर ही पॉलिसी अॅक्सेप्ट केली नाही, तरी अकाउंट डिलीट होणार पण अकाउंटचा अॅक्सेस मात्र लिमिटेड होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.