नवी दिल्ली, 8 मे : इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp ने प्रायव्हसी पॉलिसीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअॅपने आपल्या विवादीत प्रायव्हसी पॉलिसी अपडेट स्वीकारण्याबाबत 15 मेपर्यंतचा डेडलाईन संबंधीत निर्णय मागे घेतला आहे. त्याशिवाय WhatsApp ने असंही सांगितलं, की अटींचा स्वीकार न केल्यास, WhatsApp अकाउंट हटवलं किंवा डिलीट केलं जाणार नाही.
व्हॉट्सअॅपच्या या प्रायव्हसी पॉलिसीमुळे युजर्सनी नाराजी व्यक्त करत, त्यांच्या पसर्नल डेटाबाबत चिंता व्यक्त केली होती. या प्रायव्हसी पॉलिसीमुळे अनेक युजर्समध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु यावर झालेल्या अनेक टीकांनंतर आता व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्यांनी, प्रायव्हसी पॉलिसी स्वीकार न केल्यासही 15 मेनंतर अकाउंट डिलीट होणार नसल्याचं सांगितलं आहे. भारतात कोणत्याही युजरची व्हॉट्सअॅप सेवा बंद होणार नाही. तसंच पुढील काही आठवड्यात युजर्सला नवी माहिती शेअर केली जाईल, असंही ते म्हणाले.
यापूर्वी ही प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्यासाठी 8 फेब्रुवारीपर्यंतचा वेळ दिला होता. त्यानंतर ही डेडलाईन 15 मे करण्यात आली होती. अनेक युजर्स डेटा सिक्योरिटी आणि प्रायव्हसीबाबत चिंता व्यक्त करत, व्हॉट्सअॅप सोडून इतर Signal आणि Telegram सारख्या पर्यायांकडे वळले होते. अखेर आता व्हॉट्सअॅप 15 मे ही डेडलाईनही संपुष्ठात आणली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.