जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Online न दिसताच करता येणार चॅटिंग; पाहा WhatsApp ची ही कमाल ट्रिक

Online न दिसताच करता येणार चॅटिंग; पाहा WhatsApp ची ही कमाल ट्रिक

Online न दिसताच करता येणार चॅटिंग; पाहा WhatsApp ची ही कमाल ट्रिक

एखाद्याशी चॅटिंग करताना, इतरांना आपण ऑनलाईन आहोत, हे समजू नये यासाठी एक ट्रिक आहे. या ट्रिकद्वारे व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करताना युजर Online दिसणार नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 9 मे : व्हॉट्सअ‍ॅप सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. WhatsApp वर अनेक जण आपलं ऑनलाईन स्टेटस हाईड ठेवतात. अनेक जण ऑनलाईन आल्याचं दिसू नये, यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला मेसेजही वाचत नाहीत. एखाद्याशी चॅटिंग करताना, इतरांना आपण ऑनलाईन आहोत, हे समजू नये यासाठी एक ट्रिक आहे. या ट्रिकद्वारे व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करताना युजर Online दिसणार नाही. पहिल्या पद्धतीत - - यात स्मार्टफोनच्या नोटिफिकेशन विंडोचा वापर करता येईल. - ज्यावेळी व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज येतो, त्यावेळी फोनवर त्याचं नोटिफिकेशन येतं.

(वाचा -  WhatsApp Privacy Policy:व्हॉट्सअ‍ॅपकडून मोठा दिलासा,अकाउंटबद्दल महत्त्वाची घोषणा )

- जर तुमचा फोन जास्त जुना नसेल, तर मेसेजखाली Reply चा पर्यायही मिळतो. - या ऑप्शनमध्ये जाऊन, व्हॉट्सअ‍ॅप ओपन न करताच मेसेजला उत्तर देता येईल. - असं केल्याने युजरच्या Last seen स्टेटसमध्ये कोणताही बदल होणार नाही. - इतरांना तुम्ही ऑनलाईन आला आहात, याची माहिती मिळणार नाही.

(वाचा -  Netflixयुजर्ससाठी खास N-Plus सब्सक्रिप्शन;असा पाहता येणार Behind the Sceneकंटेंट )

दुसऱ्या पद्धतीमध्ये - - स्मार्टफोनचा मोबाईल डेटा आणि वायफाय कनेक्शन बंद करावं लागेल. - त्यानंतर WhatsApp ओपन करुन, त्या मेसेज किंवा चॅटवर जा, ज्याला Reply करायचा आहे. - मेसेज टाईप करुन पाठवा, या परिस्थितीत मेसेज सेंड होणार नाही.

(वाचा -  PAN Card घरबसल्या करा अपडेट, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस )

- आता व्हॉट्सअ‍ॅप बंद करा आणि स्मार्टफोनचं इंटरनेट पुन्हा सुरू करा. - मेसेज सेंड होईल आणि तुम्ही ऑनलाईनही दिसणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात