लंडन, 30 ऑक्टोबर : टेक्नोलॉजीच्या जोरावर आतापर्यंत जगभरात अनेक अनोखे, आश्चर्यचकित करणारे प्रयोग झाले आहेत. आता अशाच प्रकारचा आणखी एक प्रयोग समोर आला आहे. फोन चार्ज करण्यासाठी, टीव्ही चालवण्यसााठी आता विजेची गरज भासणार नसल्याचं संशोधन समोर आलं आहे. आता केवळ यूरिननेच (Pee Power) विज निर्मिती होऊ शकते, असं एका संशोधनातून सिद्ध करण्यात आलं आहे.
डेली स्टार रिपोर्टनुसार, यूरिनपासून बनणाऱ्या विजेवर सुरू असलेलं संशोधन यशस्वी झालं आहे. वैज्ञानिकांना यूरिननेच वीज निर्माण करण्यात यश मिळालं आहे. या नव्या संशोधनामुळे लोकांना भविष्यात सौर उर्जा आणि वायू उर्जेसह Pee Power द्वारेही वीज निर्मितीचा पर्याय मिळेल. उर्जेचा हा पर्याय स्वस्छ असण्यासह अतिशय स्वस्तही असणार आहे.
ब्रिटनमध्ये हे संशोधन करण्यात आलं. संशोधकांच्या एका टीमने मानवी मल आणि मूत्रापासून बनणारं स्वस्छ उर्जा इंधन सेल विकसित केलं आहे. या सेलद्वारे मानवी मल विजेमध्ये रुपांतरित केला जाऊ शकतो. या सेलपासून बनलेल्या विजेपासून संपूर्ण दिवसभर घरात वीज वापरता येऊ शकते, असा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे.
रिपोर्टनुसार, Pee Power प्रोजेक्ट दोन वर्षांपूर्वी एका Glastonbury festival मध्ये दाखवण्यात आला होता. इथे आलेल्या लोकांच्या यूरिनद्वारे, टॉयलेट्समध्ये जमा झालेल्या यूरिनद्वारे संशोधकांनी विजनिर्मिती केली जाऊ शकते, हे सिद्ध केलं होतं.
5 दिवस चाललेल्या या फेस्टिव्हलमध्ये जितके लोक आले होते, त्या जमा झालेल्या यूरिनद्वारे संशोधकांनी ताशी 300 वॅट वीज निर्मिती करण्यास यश मिळवलं. म्हणजेच या यूरिनपासून तयार झालेल्या विजेपासून 10 वॅट क्षमतेचा बल्ब 30 तासांपर्यंत चालू शकतात. यूरिनपासून विज तयार होऊन मोबाइल फोन, लाइट, टीव्ही आणि घरांतील इतर कामांसाठी वीज निर्माण करण्याच्या मिशनवर काम सुरू झालं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.