मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /मृत्यूनंतर कोण हँडल करेल तुमचं Google Account? वाचा या डेटाचं नेमकं काय होतं

मृत्यूनंतर कोण हँडल करेल तुमचं Google Account? वाचा या डेटाचं नेमकं काय होतं

मृत्युनंतर तुमच्या खासगी डेटाचं काय होईल? असा विचार तुम्ही कधी केला आहे का? कदाचित तुम्ही केलेला नसेलही पण गुगलने त्याचा विचार करून एक फीचर तयार केलं आहे.

मृत्युनंतर तुमच्या खासगी डेटाचं काय होईल? असा विचार तुम्ही कधी केला आहे का? कदाचित तुम्ही केलेला नसेलही पण गुगलने त्याचा विचार करून एक फीचर तयार केलं आहे.

मृत्युनंतर तुमच्या खासगी डेटाचं काय होईल? असा विचार तुम्ही कधी केला आहे का? कदाचित तुम्ही केलेला नसेलही पण गुगलने त्याचा विचार करून एक फीचर तयार केलं आहे.

  नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : तुम्ही Google किंवा Apple सारख्या IT कंपन्यांच्या क्लाउड सर्व्हिसवर सेव्ह केलेल्या खासगी डेटाचं तुमच्या मृत्युनंतर काय होईल? असा विचार तुम्ही कधी केला आहे का? कदाचित तुम्ही केलेला नसेलही पण गुगलने त्याचा विचार करून एक फीचर तयार केलं आहे. त्याचा वापर करून आपण ठरवू शकतो की आपलं गुगल अकाउंट इनॲक्टिव्ह (Inactive Account) कधी समजलं जावं त्यानंतर आपल्या डेटाचं काय करावं याबाबत कंपनी कार्यवाही करते.

  तुम्ही जर गुगलच्या Google Maps, Gmail, Search, or Google Photos या सेवा वापरत असाल किंवा तुमच्याकडे Android phone जरी असला तरीही तुमच्या सवयी आणि इतर माहिती असा खूप मोठा डेटा गुगलकडे सेव्ह गेलेला आहे. काही जणं तर Google Pay वापरण्यासाठी त्यांच्या बँक खात्याची महत्त्वाची माहिती गुगलमध्ये सेव्ह करून ठेवतात. आपल्या मृत्युनंतर या सगळ्या डेटाची योग्य काळजी घेणाऱ्या व्यक्तीच्या हातात तो पडायला हवा असं तुम्हाला नक्की वाटत असेल तर मग जाणून घ्या तुमचा डेटा सुरक्षित (safekeep your data) कसा ठेवाल?

  दीर्घकाळ एखाद्या युजरने त्याचं Google Account वापरलंच नाही असं गुगलला लक्षात आलं की ते इनॲक्टिव्ह आहे असं कंपनी समजते. तुमचं गुगल अकाउंट कधीपासून इनॲक्टिव्ह मानलं जावं, त्यानंतर त्यातील डेटाचं काय करावं हे ठरवण्याची सोय तुम्हाला गुगलने उपलब्ध करून दिली आहे. तसंच तुमच्या अकाउंटमधला डेटा एखाद्या विश्वासार्ह व्यक्तीशी शेअर करण्याचीही सोय आहे.

  तिसरा पर्याय म्हणजे तुम्ही गुगल अकाउंट इनॲक्टिव्ह करून ते डिलिट करायलाही सांगू शकता. गुगलनी म्हटलंय,‘तुम्ही जर दीर्घ काळ गुगल अकाउंट वापरलं नसेल, तर वर सांगितलेल्या तीन प्लॅनपैकी तुम्ही जो प्लॅन सेट केला असेल तशी कार्यवाही आम्ही करू. पण हा प्लॅन प्रत्यक्षात आणण्यापूर्वी आम्ही किती काळ वाट पहायची हे वापरणाऱ्याने सांगायला हवं.’

  अकाउंट बंद करण्यापूर्वी गुगल ग्राहकाला पुरेसा वेळ विचार करण्यासाठी देतं. युजर्स यासाठी जास्तीतजास्त 18 महिन्यांचा वेळ मागून घेऊ शकतात. तुम्ही myaccount.google.com/inactive इथे जाऊन तुमचं अकाउंट मॅनेज करू शकता. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अकाउंटचा पासवर्ड केवळ अतिविश्वास असलेल्या व्यक्तीशीच शेअर करा. तुम्ही या लिंकवर खातं इनॲक्टिव्ह होण्यासाठी किती काळ थांबायचं (waiting time period for inactivity), तुमचा ई-मेल आयडी, फोन नंबर आणि इतर माहिती भरू शकता.

  Google Search मध्ये भन्नाट अपडेट! गुगलवर काहीही शोधणं अधिकच सोपं;काय आहे हे फीचर

  त्यानंतर तुमचं खातं इनॲक्टिव्ह झाल्यानंतर तुमच्या खात्यातली माहिती शेअर करता येईल अशा तुमच्या विश्वासातल्या 10 व्यक्ती निवडण्याचा पर्याय तुमच्यासमोर येईल. विश्वासार्ह ई-मेल आयडी असेल, तर युजर त्याच्या डेटापैकी काही डेटाला अक्सेस देऊन तो डाउनलोड करण्याचे अधिकारही त्या व्यक्तीला देऊ शकतो.

  तुमचा गुगल अकाउंट डेटा कुणाशी शेअर करायची इच्छा नसेल, तर कुणाचाच ई-मेल आयडी देऊ नका. याचाच अर्थ असा आहे की तुम्ही ते गुगल अकाउंट इनॲक्टिव्ह केल्यानंतर त्यातील डेटा डिलिट केला जाईल आणि तो कुणाला अक्सेस करता येणार नाही किंवा रिस्टोरही (your data will get deleted and no one will ever be able to restore it) करता येणार नाही.

  तुम्ही जर विश्वासार्ह व्यक्तीचा ई-मेल आयडी तिथे दिला, तर गुगल तुम्हाला Google Pay, Google Photos, Google Chat, Location history, and everything else यापैकी कुठला डेटा शेअर करायचा हे विचारेल. तुम्ही निवडाल तो डेटा त्या व्यक्तीला तुमचं खातं इनॲक्टिव्ह झाल्यानंतर पुढचे 3 महिने अक्सेस करता येईल.

  Googleने बॅन केले Login-IDचोरी करणारे Apps,लगेच डिलीट करुन बदलाFacebook Password

  तुम्ही हा सेटअप करताना दिलेला मेसेज आणि डेटाची लिंक गुगल तुमच्या विश्वासार्ह व्यक्तीला ई-मेलद्वारे पाठवेल. या मेलच्या शेवटी गुगल असा उल्लेख करेल की तुम्ही कंपनीला तशी विनंती केली होती, की तुम्ही गुगल अकाउंट इनॲक्टिव्ह केल्यानंतर हा डेटा त्या व्यक्तीला पाठवण्यात यावा. त्याला अनुसरून ही माहिती आपल्याला पाठवत आहोत.

  तुम्ही जर खातं इनॲक्टिव्ह केल्यानंतर डाटा डिलिट करायला कंपनीला सांगितलंत, तर त्या खात्यात असलेल्या सगळा डाटा गुगल डिलिट करून टाकेल. त्यात YouTube videos, location history, search history, Google Pay data आणि इतर डाटाचा समावेश असेल.

  First published:
  top videos

   Tags: Google, Tech news