मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Google Search मध्ये भन्नाट अपडेट! गुगलवर काहीही शोधणं अधिकच सोपं; वाचा काय आहे फीचर

Google Search मध्ये भन्नाट अपडेट! गुगलवर काहीही शोधणं अधिकच सोपं; वाचा काय आहे फीचर

आता गुगल सर्च करणं अधिकच परिणामकारक आणि मदतीचं (Google Search New Update) ठरणार आहे. गूगलने जाहीर केले आहे की ते त्यांच्या मोबाइल प्लॅटफॉर्मवर पेज बेस्ड सर्च रिजल्ट्स (Google will remove page based search) काढून टाकले जाणार आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 16 ऑक्टोबर: एखाद्या गोष्टीबाबत जाणून घ्यायचे असेल, संशोधन करायचे असेल तर आत सर्वात आधी गुगलला (Google Search) याबाबत विचारले जाते, अर्थात गुगल सर्च करून माहित नसलेल्या गोष्टीबाबत जाणून घेतले जाते. दरम्यान आता गुगल सर्च करणं अधिकच परिणामकारक आणि मदतीचं (Google Search New Update) ठरणार आहे. गूगलने जाहीर केले आहे की ते त्यांच्या मोबाइल प्लॅटफॉर्मवर पेज बेस्ड सर्च रिजल्ट्स (Google will remove page based search) काढून टाकून सतत स्क्रोल करण्यायोग्य युजर इंटरफेस आणत आहे. गुगलने सांगितले की हा सर्च एक्सपीरियन्स सध्या अमेरिकेतील मोबाईल वापरकर्त्यांना इंग्रजीतून सर्च केल्यास मिळेल.

काय आहे अपडेट

कंपनीने त्यांच्या एका स्टेटमेंटमध्ये याबाबत माहिती दिली आहे. एखादी गोष्ट गूगलवर सर्च केल्यानंतर काहीवेळा आपल्याला उपयोगी उत्तर मिळून जातं. पण अनेकदा चौथ्या-पाचव्या पेजवर पोहोचल्यानंतर अपेक्षित माहिती मिळते. आता या नवीन अपडेटमध्ये तुम्हाला  'See More' बटणवर क्लिक करण्याची आवश्यकता भासणार नाही. तुम्ही सलग ब्राउज करू शकता आणि अपेक्षित उत्तरापर्यंत पोहचू शकता. अर्थात यामध्ये तुम्हाला सर्च रिझल्टच्या पुढच्या पानावर जाण्यासाठी कोणतंही क्लिक करावं लागणार नाही. Google Search Engine स्वत: पुढचं पेज लोड करेल. त्यामुळे तुम्ही तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळेपर्यंत सलग स्क्रोल करू शकता.

वाचा-Nokia चा सर्वात मजबूत फोन; पडल्यावर तुटणार नाही, पाण्यातही खराब होणार नाही

कंपनीने असं म्हटलं आहे की, गुगल सर्च इंजिनवर सातत्याने स्क्रोल केल्यामुळे तुम्हाला असे अनेक पर्याय दिसू शकतात, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नव्हता.

First published:

Tags: Google