• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या Aadhaar, पॅन कार्ड, पासपोर्ट अशा कागदपत्रांचं काय होतं? पाहा डिटेल्स

एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या Aadhaar, पॅन कार्ड, पासपोर्ट अशा कागदपत्रांचं काय होतं? पाहा डिटेल्स

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू (Death) झाल्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट या कागदपत्रांचं काय करायचं असतं, याबाबत माहिती आहे का?

  • Share this:
नवी दिल्ली, 2 ऑगस्ट : आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट ही कागदपत्रं प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाची (Important Documents) असतात. सरकारी ओळखपत्रं म्हणून ही कागदपत्रं महत्त्वाची आहेतच, तसंच कोणतीही महत्त्वाची कामं या कागदपत्रांशिवाय होऊ शकत नाहीत. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही ही कागदपत्र लागतात. पण एखाद्या व्यक्तीचा मृत्यू (Death) झाल्यानंतर या कागदपत्रांचं काय करायचं असतं, याबाबत माहिती आहे का? ही कागदपत्रं आपोआप रद्द होतात की कुटुंबातल्या व्यक्तींना ती रद्द (Cancelling ID) करावी लागतात? असे काही प्रश्न अनेकांच्या मनात येत असतील. जी कागदपत्रं मृत्यूनंतर रद्द करण्याची तरतूद आहे, तिथे संबंधित व्यक्तीच्या मृत्यूचा पुरावा म्हणून डेथ सर्टिफिकेट (Death Certificate) सादर करावं लागतं. मतदार ओळखपत्र (Voter ID) - मतदार ओळखपत्र अर्थात व्होटर आयडी कार्ड हे मतदान करण्यासाठी अत्यावश्यक असलेलं ओळखपत्र आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर मतदार ओळखपत्र रद्द करता येतं. मतदार नोंदणी नियम 1960 अंतर्गत मतदार ओळखपत्र मतदाराच्या मृत्यूनंतर रद्द करण्याची तरतूद आहे. कुटुंबातल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर संबंधिताचं मतदार ओळखपत्र निवडणूक कार्यालयात जाऊन सात नंबरचा फॉर्म भरून रद्द करता येतं. यासाठी संबंधित मृत व्यक्तीचं डेथ सर्टिफिकेट सोबत द्यावं लागतं. आता Aadhaar लाही लावता येणार मास्क; जाणून घ्या याचे फायदे, कसं कराल डाउनलोड पॅन कार्ड (PAN Card) - इन्कम टॅक्स भरण्यासह इतर आर्थिक सेवा-सुविधांचा लाभ घेण्यासाठी पॅनकार्ड हे अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे. पॅनकार्ड अनेक अकाउंटशी जोडलेलं असतं. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींने आयकर विभागाशी संपर्क साधून पॅनकार्ड परत करणं (Surrender) आवश्यक असतं. मात्र ते सरेंडर करण्यापूर्वी मृत व्यक्तीची त्या पॅनकार्डशी जोडलेली सर्व बँक खाती बंद करावीत. अन्यथा पॅन रद्द केल्यानंतर ती खाती बंद करण्यात समस्या येऊ शकतात. पासपोर्ट (Passport) - मृत्यूनंतर पासपोर्ट रद्द करण्याची कोणतीही तरतूद नाही. मात्र पासपोर्टची वैधता, त्याचा कालावधी संपल्यानंतर तो पुन्हा रिन्यू केला नाही, तर तो आपोआपच रद्द होतो. Mobile Phone चोरी झाल्यास आता सरकारच करणार मदत, करावं लागेल हे एक काम आधार कार्ड (Aadhaar Card) - आधार कार्ड सध्याच्या काळात अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. एलपीजी सबसिडी, सरकारी शिष्यवृत्ती, ईपीएफओ खातं आणि इतर अनेक महत्त्वाच्या सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक देणं गरजेचं असतं. परंतु, मृत व्यक्तीचं आधार कार्ड रद्द करण्याची कोणतीही प्रक्रिया UIDAI कडून सांगण्यात आलेली नाही. मात्र मृत व्यक्तीने जिवंतपणी सरकारी योजनेचा लाभ घेतला असेल, तर त्याच्या कुटुंबीयांना त्या व्यक्तीच्या मृत्यूची माहिती UIDAI कडे देणं गरजेचं आहे. सरकारी योजना आधारशी लिंक असल्याने ही माहिती देणं गरजेचं ठरतं.
First published: