मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आता Aadhaar लाही लावता येणार मास्क; जाणून घ्या याचे फायदे, कसं कराल डाउनलोड

आता Aadhaar लाही लावता येणार मास्क; जाणून घ्या याचे फायदे, कसं कराल डाउनलोड

इथे संपर्कासाठी Ask Aadhaar वर क्लिक करा. ग्राहकाला आधार Executive शी लिंक केलं जाईल. इथे ग्राहक आपली समस्या सांगून मदत मिळवू शकतात.

इथे संपर्कासाठी Ask Aadhaar वर क्लिक करा. ग्राहकाला आधार Executive शी लिंक केलं जाईल. इथे ग्राहक आपली समस्या सांगून मदत मिळवू शकतात.

ज्यावेळी तुमचा आधार नंबर इतर कोणाशी शेअर करायचा नसेल, त्यावेळी आधार मास्क करण्याची सुविधा वापरता येऊ शकते. UIDAI च्या वेबसाईटवरुन Masked e-Aadhaar कार्ड सहजपणे डाउनलोड करता येऊ शकतं.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 2 ऑगस्ट : खासगी तसंच सरकारी अनेक कामांसाठी आधार कार्ड (Aadhaar Card) सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. आता आधार कार्डसाठी UIDAI कडून नवं फीचर जारी करण्यात आलं आहे. या नव्या फीचरमुळे 12 अंकी आधार नंबर कव्हर केला जाऊ शकतो, जेणेकरुन तो अधिक सुरक्षित केला जाऊ शकेल. याला आधार मास्क (Aadhaar Masked) करणं असं म्हटलं आहे. ज्यावेळी तुमचा आधार नंबर इतर कोणाशी शेअर करायचा नसेल, त्यावेळी आधार मास्क करण्याची सुविधा वापरता येऊ शकते. UIDAI च्या वेबसाईटवरुन Masked e-Aadhaar कार्ड सहजपणे डाउनलोड करता येऊ शकतं.

आधार कार्ड Masked केल्यानंतर Aadhaar नंबरमधील पहिले 8 अंक लपवले जातात. लपवलेल्या 8 अंकाच्या जागी ती संख्या XXXX-XXXX अशी दिसेल. या Masked Aadhaar मध्ये शेवटचे केवळ चार अंकच दिसतील. अशाप्रकारे UIDAI द्वारे जारी करण्यात आलेली ही Masked Aadhaar ची सुविधा जवळपास सर्व ठिकाणी वैध मानली जाणार आहे. जिथे महत्त्वाचं कागदपत्र म्हणून आयडेंटिटी प्रुफ Aadhaar Card दाखवण्याची गरज असते, त्या सर्व ठिकाणी हे Masked Aadhaar Card वैध मानलं जाणार आहे. उज्ज्वला योजना, LPG सबसिडी या सरकारी योजनांसाठी हे Masked Aadhaar वापरता येणार नाही.

इंग्रजीच नाही,तर आता तुमच्या भाषेतही बनवता येणार Aadhaar Card,जाणून घ्या प्रोसेस

कसं डाउनलोड कराल Masked Aadhaar?

- सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर https://uidai.gov.in/ वर जावं लागेल.

- त्यानंतर My Aadhaar पर्यायावर क्लिक करावं लागेल.

- इथे Download Aadhaar सिलेक्ट करावं लागेल.

- e-Aadhaar डाउनलोड करण्यासाठी Aadhaar Number, Enrolment ID आणि Virtual ID असे तीन पर्याय दिसतील.

- इथे I Want a Masked Aadhaar असा पर्याय दिसेल, त्या चेक बॉक्सवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर Send OTP वर क्लिक करा. रजिस्टर्ड नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर Masked Aadhaar अॅक्सेस करता येईल.

First published: