• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • Mobile Phone चोरी झाल्यास आता सरकारच करणार मदत, करावं लागेल हे एक काम

Mobile Phone चोरी झाल्यास आता सरकारच करणार मदत, करावं लागेल हे एक काम

आता चोरी झालेला किंवा हरवलेला फोन लगेच ब्लॉक करता येऊ शकतो. तसंच फोन मिळाल्यानंतर तो अनलॉकही करता येऊ शकतो.

  • Share this:
    नवी दिल्ली, 2 ऑगस्ट : मोबाईल फोन (Mobile Phone) सर्वाच्याच आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. बँकिंग, ऑनलाईन क्लासेस, ऑफिस अशा अनेक कामांसाठी मोबाईलची मदत होते. फोनमध्ये केवळ फोटो, व्हिडीओ, कॉन्टॅक्ट नंबर्स इतकंच नसतं, तर अनेक सोशल मीडिया अकाउंट्स, बँक अकाउंट्सदेखील ओपन असतात. अशात मोबाईल फोन हरवला किंवा चोरीला गेल्यास (Mobile Phone lost/ Stolen), मोठी समस्या निर्माण होते. परंतु आता फोन हरवल्यानंतर टेन्शन घेण्याची गरज नाही. आता चोरी झालेला किंवा हरवलेला फोन लगेच ब्लॉक करता येऊ शकतो. तसंच फोन मिळाल्यानंतर तो अनलॉकही करता येऊ शकतो. टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटने सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) नावाने एक प्रोजेक्ट सुरू केला आहे. हरवलेला किंवा चोरी झालेल्या फोनला सर्व मोबाईल नेटवर्कवर ब्लॉक करण्याची, अशा फोनचा शोध घेण्यासाठी, चोरीला परावृत्त करण्याच्या उद्देशाने हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे. असा करा फोन ब्लॉक - - फोन ब्लॉक करण्यासाठी https://www.ceir.gov.in/Home/index.jsp या सरकारी वेबसाईटवर जावं लागेल. - होमपेजवर Block Stolen/ lost mobile असं एक लाल रंगाचं बटण दिसेल. - त्यावर क्लिक केल्यानंतर, एक फॉर्म ओपन होईल. - इथे मोबाईल नंबर, IMEI 1/IMEI 2, फोन कंपनी, फोन मॉडेल, चोरी झालेल्या फोनचं बिल यासारखी माहिती भरावी लागेल. - त्यानंतर Submit वर क्लिक करावं लागेल. अशारितीने फोन ब्लॉक करता येईल. तुमच्याकडे Contactless क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आहे का? अशी बाळगा सावधगिरी फोन मिळाल्यानंतर असा करा Unlock - - हरवलेला किंवा चोरी झालेला फोन मिळाल्यानंतर तो पुन्हा सुरू करण्यासाठी https://www.ceir.gov.in/Home/index.jsp या वेबसाईटवर जावं लागेल. - इथे Un-Block Found Mobile या हिरव्या रंगाच्या बटणावर क्लिक करावं लागेल. - पुन्हा एक फॉर्म ओपन होईल. यात मोबाईल नंबरसह इतर डिटेल्स भरावे लागतील. - त्यानंतर OTP मागितला जाईल. OTP साठी दुसरा मोबाईल नंबर दिला जाऊ शकतो. सर्व डिटेल्स भरल्यानंतर सबमिटवर क्लिक करावं लागेल. आता Aadhaar लाही लावता येणार मास्क; जाणून घ्या याचे फायदे, कसं कराल डाउनलोड महत्त्वाची बाब म्हणजे मोबाईल खरेदी केलेलं बिल असणं गरजेचं आहे. तसंच मोबाईल हरवल्याची FIR दाखल करावी लागेल. शिवाय हरवलेला मोबाईल मिळाल्यानंतर तो पुन्हा अनलॉक करण्यासाठी तुमच्याकडे फोन ब्लॉक करताना दिलेले डिटेल्सही असणं आवश्यक आहे.
    Published by:Karishma
    First published: