नवी दिल्ली, 13 एप्रिल : सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मची जोरदार चर्चा आहे. कोरोना काळात तर OTT प्लॅटफॉर्मचं अनेकांच्या मनोरंजनाचं साधन झालं होतं. सध्या मोबाईल आणि स्मार्ट टीव्हीवर OTT प्लॅटफॉर्म Netflix सर्वाधिक पाहिलं जातं. नेटफ्लिक्स जगभरात सर्वात जास्त क्वालिटी कंटेंट देण्यासाठीही प्रसिद्ध आहे. या प्लॅटफॉर्मवर हजारो मूव्हीज आणि ओरिजिनल सीरीज पाहायला मिळतात. परंतु नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन अतिशय महाग असल्याने अनेक लोक Netflix पाहू शकत नाहीत. परंतु आता अशा लोकांसाठी एक जबरदस्त संधी आहे. आता नेटफ्लिक्स फ्रीमध्येच पाहता येणार आहे. फ्रीमध्ये पाहा Netflix - अतिशय कमी लोकांना नेटफ्लिक्स फ्रीमध्येही पाहता येऊ शकतं, हे माहितेय. नेटफ्लिक्स फ्रीमध्ये पाहण्यासाठी ईमेल आयडी किंवा कार्ड डिटेल्सही टाकण्याची गरज लागणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आता नेटफ्लिक्समध्ये अनेक मूव्हीज आणि सीरीज मोफत पाहता येऊ शकतात. अर्थात नेटफ्लिक्सचा काही कंटेंट फ्रीमध्ये आहे.
(वाचा - तुम्ही Jio युजर्स आहात का? मग जाणून घ्या जिओच्या मिस्ड कॉल अलर्ट सर्विसचे फायदे )
Netflix फ्रीमध्ये पाहण्यासाठी अशी आहे प्रोसेस - सर्वात आधी netflix.com/watch-free वर जावं लागेल. पेज ओपन झाल्यानंतर अनेक पर्याय दिसतील. ज्यात मूव्ही किंवा सीरीजच्या पुढे Watch Now असं लिहिलेलं असेल, त्यावर क्लिक करा. Watch Now याचा अर्थ नेटफ्लिक्सचा हा कंटेंट मोफत आहे. नेटफ्लिक्सवर अनेक मूव्ही आणि सीरीज फ्रीमध्ये आहेत. परंतु त्यापैकी पॉप्युलर Elite, Love is Blind, The Boss Baby in Business आणि Stranger Things या सीरीज फ्रीमध्ये पाहता येईल. पण या सर्व सीरीजचे काहीच एपिसोड मोफत आहेत. पुढचे एपिसोड पाहण्यासाठी युजरला Netflix Subscription घ्यावं लागेल.
(वाचा - लाखोंमध्ये एखादीच होते अशी गडबड;2 लाख रुपयांत विकला गेला अनोख्या डिझाईनचा iPhone )
दरम्यान, नेटफ्लिक्सचे एकूण 4 प्लॅन मिळतात. ज्यात 199, 299, 649 आणि 799 रुपयांचे प्लॅन्स आहेत. 199 चा प्लॅन केवळ मोबाईलवरच पाहता येईल, तर 299 चा प्लॅन कंम्यूटर आणि टॅबलेटवर पाहता येईल. इतर प्लॅन टीव्हीवरही पाहता येऊ शकतात. यात क्वॉलिटीचा चांगला परिणाम मिळतो.

)







