• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • तुम्ही Jio युजर्स आहात का? मग जाणून घ्या जिओच्या मिस्ड कॉल अलर्ट सर्विसचे फायदे

तुम्ही Jio युजर्स आहात का? मग जाणून घ्या जिओच्या मिस्ड कॉल अलर्ट सर्विसचे फायदे

फोन स्विच ऑफ झाल्यानंतर आणि फोन नेटवर्कपासून दूर असल्यास फोन आल्याची माहिती मिळत नाही. परंतु जिओ मिस्ड कॉल अलर्ट सर्विसद्वारे युजरच्या नंबरवर येऊन गेलेल्या कॉलची माहिती SMS द्वारे मिळेल.

 • Share this:
  नवी दिल्ली, 13 एप्रिल : अनेकदा आपला फोन स्विच ऑफ झाल्यानंतर, नेमकी त्याचवेळी येऊन गेलेल्या अनेक कॉल्सबाबत माहिती मिळत नाही. अशात जर एखादा महत्त्वाचा कॉल असेल, तर त्याबाबत माहिती मिळणं गरजेचं असतं. याच पार्श्वभूमीवर देशातील दिग्गज नेटवर्क प्रोव्हाईडर कंपनी रिलायन्स जिओ मिस्ड कॉल अलर्ट सुविधा देते. या सर्विसमुळे जिओ युजर्सला फोन बंद असताना कोणत्या नंबरवरुन मिस कॉल आले याची माहिती मिळेल. फोन स्विच ऑफ झाल्यानंतर आणि फोन नेटवर्कपासून दूर असल्यास फोन आल्याची माहिती मिळत नाही. परंतु जिओ मिस्ड कॉल अलर्ट सर्विसद्वारे युजरच्या नंबरवर येऊन गेलेल्या कॉलची माहिती SMS द्वारे मिळेल. जिओ मिस्ड कॉल सर्विस - जिओची मिस्ड कॉल सर्विस USSD कोडद्वारे अ‍ॅक्टिव्हेट करू नये. Jio ची ही सर्विस सर्व नंबरवर आधीपासूनच अ‍ॅक्टिव्हेट असते. या सर्विससाठी कंपनीही कोणताही एक्स्ट्रा चार्ज घेत नाही. या सर्विसचा फायदा इंटरनॅशनल रोमिंगमध्येही घेतला जाऊ शकतो. ही सर्विस युजर्सच्या नंबरवर योग्यरित्या काम करत नसेल, तर युजर्स कस्टमर सपोर्टकडे याबाबत माहिती देऊ शकतात.

  (वाचा - आश्चर्यच आहे! वर्षभर पाण्यात राहूनही चालू स्थितीत राहिला iPhone 11 Pro Max)

  एखाद्या ठिकाणी नेटवर्क येत नसल्यास, मिस्ड कॉल अलर्ट सर्विसचा फायदा होतो. जेव्हा फोन स्विच ऑफ होतो, तेव्हादेखील ही सर्विस कामात येते. तसंच एखाद्याशी बोलताना, दुसऱ्या नंबरवरुन कॉल आल्यास त्यावेळीदेखील ही सर्विस फायद्याची ठरते. कंपनीची ही सर्विस सर्व जिओ नंबरवर फ्री मिळते. युजर्सला मिस्ड कॉलची माहिती एसएमएसवर मिळते. ही सर्विस नको असल्यास, ती डिअॅक्टिव्हेट करण्यासाठी सध्या असा कोणताही पर्याय नाही.
  Published by:Karishma Bhurke
  First published: