Home /News /technology /

नवी फोर व्हिलर घ्यायचा विचार करताय? लाँच होणार या जबरदस्त कार्स; जाणून घ्या काय असतील किंमती आणि फिचर्स

नवी फोर व्हिलर घ्यायचा विचार करताय? लाँच होणार या जबरदस्त कार्स; जाणून घ्या काय असतील किंमती आणि फिचर्स

भारतातील ऑटो सेक्टरने गेल्या तिमाहीत चांगली सुधारणा दाखवली आहे. डिसेंबर महिन्यात किंवा नवीन वर्षात नवी फोर व्हिलर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी सर्वच कंपन्यांनी उत्तम पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

  नवी दिल्ली, 1 डिसेंबर : जागतिक स्तरावर 2020 हे वर्ष प्रचंड आव्हानात्मक ठरलं. सगळ्या जगाच्या अर्थचक्रावर परिणाम करणाऱ्या कोरोना महामारीमुळे प्रगतीचा वेग मंदावला असला तरी आता व्यवहार पूर्वपदावर येण्याच्या दिशेने सुरू झाले आहेत. भारतातील ऑटो सेक्टरने गेल्या तिमाहीत चांगली सुधारणा दाखवली आहे. डिसेंबर महिन्यात किंवा नवीन वर्षात नवी फोर व्हिलर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी सर्वच कंपन्यांनी उत्तम पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. Nissan Magnite - या वर्षाच्या शेवटाला होणारा सर्वांत मोठा कार लाँच म्हणजे निस्सानची एसयूव्ही मॅग्नाइट. त्याचं कारणही तसंच आहे, कॉम्पॅक्ट एसयूव्ही या सेगमेंटमधील तिच्या सर्व प्रतिस्पर्धी गाड्यांना टक्कर देत असून बाजारात या कारची जबरदस्त चर्चा आहे. अनेक दृष्टीने भारतीय बाजारपेठेत आपलं स्थान निर्माण करण्यासाठी Nissan Magnite सज्ज आहे. नव्या Nissan Magnite ची XE, XL, XV आणि XV प्रीमियम ही मॉडेल्स लाँच होतील. इंजिन आणि ट्रान्समिशनच्या पर्यायांनुसार याच मॉडेल्सचे 20 वेगवेगळे पर्याय ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. 1.0 लिटर पेट्रोल आणि एक लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असे इंजिनचे दोन पर्याय उपलब्ध होतील. दोन्ही इंजिनच्या गाड्यांत 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असेल. टर्बो पेट्रोल गाडीमध्ये सीव्हीटी ऑटोमॅटिक युनिटचा पर्यायही ग्राहकांना उपलब्ध आहे.

  (वाचा - भारतीय FAU-G Mobile Game लवकरचं लाँच होणार; Play Store वर प्री-रजिस्ट्रेशन सुरू)

  Mercedes A-Class Limousine - फेब्रुवारी 2020 च्या ऑटो एक्स्पोमध्ये मर्सिडिस-बेंझ ए-क्लास लिमोझिन सादर करण्यात आली होती. मर्सिडिस बेंझ इंडिया ही जबरदस्त गाडी बाजारात डिसेंबरमध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनी या कारच्या माध्यमातून भारतातील लक्झरी सेगमेंटमध्ये प्रवेश करतीये, त्यामुळे ही या वर्षातली बहुप्रतिक्षित लक्झरी कार ठरणार आहे. कंपनीला एप्रिल महिन्यातच ही गाडी लाँच करायची होती, पण कोविड महामारीमुळे ते पुढे ढकलण्यात आलं. 2020 वर्षाअखेरीस ए-क्लास गाडीची भारतात विक्री सुरू होईल असं कंपनीचे एमडी आणि सीईओ मार्टिन श्वेनक यांनी ऑक्टोबर महिन्यात सांगितलं होतं. या गाडीत 2.0 लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिनासोबतच एएमजी हे व्हर्जनही उपलब्ध होणार आहे.

  (वाचा - Ola आणि Uber प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; सरकारकडून नवे नियम जारी)

  Audi S5 Sportback - ऑडी इंडियाने ऑडी एस 5 स्पोर्टबॅक मॉडेल लवकरच लाँच करणार असल्याचं गेल्या महिन्यात जाहीर केलं होतं. ऑडी क्यू 2 लाँच करताना एस 5 स्पोर्टबॅक गाडी नोव्हेंबर 2020 मध्ये लाँच केली जाईल, असा टीझर दाखवण्यात आला होता. नुकतंच कंपनीने भारतातील वेबासाइटवर ही गाडी लिस्ट केली आहे, त्यामुळे डिसेंबरमध्ये किंवा लवकरच ही गाडी लाँच होईल अशी शक्यता आहे. कंपनीची 2020 मधील भारतात लाँच होणारी सहावी आणि शेवटची गाडी असेल. Force Gurkha 2020 - महिंद्राच्या थारनंतर या गाडीला टक्कर म्हणून तिची प्रतिस्पर्धी गाडी फोर्स गुरखा डिसेंबर 2020 महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. ऑटो एक्स्पोमध्ये फोर्स गुरखा सादर झाली होती, पण कोविडमुळे लाँच पुढे ढकलण्यात आलं. कोणत्याही टरेनमध्ये जबरदस्त ठरणाऱ्या एसयूव्हीची वैशिष्ट्य थारसारखीच आहेत. पण गुरखाची केबिन आणि एक्सटिरिअर अधिक प्रभावी असतील.

  (वाचा - मोदी सरकारचा नवा प्लॅन; या नियमांचं पालन न केल्यास रद्द होईल गाडीचं रजिस्ट्रेशन)

  Tata Altroz Turbo - टाटा कंपनी लवकरच आपल्या अल्ट्रोज या प्रीमियम हॅचबॅक कारचं टर्बो पेट्रोल मॉडेल लाँच करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्स 2021 मध्ये अल्ट्रोज टर्बो पेट्रोल मॉडेल लाँच करू शकते. भारतात टाटा अल्ट्रोज कारची किंमत 8 लाख रुपयांपासून सुरू होते. Tata Tigor EV Facelift - टाटा मोटर्स कंपनी लवकरच टिगोर ईव्ही फेसलिफ्ट हे मॉडेल बाजारात आणणार आहे. ही गाडी जानेवारी 2020 मध्ये लाँच केलेल्या स्टँडर्ड टिगोरसारखीच असेल. या कारमध्ये 21.5 kWh बॅटरी असेल. कार 40bhp आणि 105Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. ही कार 2021 मध्ये लाँच होईल.

  (वाचा - स्वस्तात मस्त कार घ्यायची? एकाच छताखाली मिळणार ब्रँडेड गाड्या!)

  Tata Tiago EV - टाटा मोटर्स लोकप्रिय हॅचबॅक कार टाटा टिएगोचं इलेक्टिक मॉडेल 2021 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कार संपूर्ण चार्ज केल्यावर 213 किलोमीटर प्रवास करू शकते. यात 21.5 kWh ची बॅटरी आहे. या गाडीची किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Car

  पुढील बातम्या