त्याशिवाय सरकार प्रदूषणाची तपासणीही ऑनलाईन करण्याचा प्लॅन करत आहे. एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. या नव्या प्लॅनिंगनंतर प्रदूषण चाचणी केंद्र, प्रदूषण प्रमाणपत्र, वाहन मालक आणि वाहनाची माहिती राष्ट्रीय मोटर वाहन रजिस्टरमध्ये उपलब्ध होईल. यामुळे कोणीही खोटं प्रदूषण प्रमाणपत्र मिळवू शकत नाही.
ऑनलाईन प्रदूषण तपासणीत वाहनाच्या मालकाचा मोबाईल नंबर डेटाबेसमध्ये एंटर केला जाईल. त्यानंतर वाहनाच्या मालकाला एक ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी एंटर केल्यानंतर प्रदूषण तपासणी फॉर्म ओपन होईल. यात प्रदूषणाची पातळी ठरलेल्या मानकाहून अधिक उत्सर्जित झाल्यास, कंप्यूटरद्वारे रिजेक्टची रिसीट येईल. अशाप्रकारच्या प्रोसेसमुळे प्रदूषण तपासणी केंद्रात कोणतीही हेराफेरी होऊ शकत नाही.