नवी दिल्ली, 1 डिसेंबर : भारतात पॉप्युलर बॅटल रॉयल गेम PUBG Mobile बॅन करण्यात आला. त्यानंतर पबजी सारखाच पण भारतीय इंडियन मेड FAU-G अर्थात Fearless and United Guards ची घोषणा करण्यात आली. सध्या गेमर्स याच्या अधिकृत लाँचच्या प्रतिक्षेत आहेत. पण आता या मेड इन इंडिया गेमला Google Play Store वर लिस्ट करण्यात आलं आहे.
गुगल प्ले स्टोरवर FAU-G लिस्टेड करण्यात आला असला, तरी अद्याप अँड्रॉईड युजर्स हा गेम इन्स्टॉल करू शकत नाहीत. सध्या हा गेम डेव्हलप करणाऱ्या कंपनी Studio nCore ने केवळ युजर्सला गेमसाठी प्री-रजिस्टर करण्याचा पर्याय दिला आहे. एकदा या गेमसाठी प्री-रजिस्टर केल्यानंतर गेम लाँच झाल्यानंतर युजरला नोटिफिकेशन पाठवलं जाईल. अशाप्रकारे प्री-रजिस्टर करणारे युजर्स हा गेम सर्वात आधी डाउनलोड आणि इन्स्टॉल करू शकतील.
FAU-G गेमचा पहिला एपिसोड गलवान खोऱ्यातील घटनेवर आधारित आहे, जो गेमच्या टिजरमध्ये दाखवण्यात आला आहे. FAU-G मध्ये प्लेयर्स भारतीय सैन्याच्या रुपात दिसणार आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने याबाबत ट्विट करून माहिती दिली होती. या गेमचा एक अधिकृत सिनेमॅटिक टीजरही जाहीर करण्यात आला होता.
Today we celebrate the victory of good over evil, and what better day to celebrate our Fearless and United Guards, our FAU-G! On the auspicious occasion of Dussehra, presenting the #FAUG teaser.@nCore_games @BharatKeVeer @vishalgondal #AtmanirbharBharat #StartupIndia pic.twitter.com/5lvPBa2Uxz
— Akshay Kumar (@akshaykumar) October 25, 2020
FAU-G गेम भारतीय गेम डेव्हलपर कंपनी nCore Games ने तयार केला आहे. nCore Games चे संस्थापक आणि प्रमुख विशाल गोंडल यांनी सांगितलं की, FAU-G गेम, पबजीला रिप्लेस करेल आणि पबजी ज्याप्रमाणे लोकप्रिय होता, तसाच हादेखील लोकल आणि ग्लोबल स्तरावर लोकप्रिय होईल.
भारत-चीनमधील संघर्ष आणि अनेक चीनी ऍप्सवरील बॅननंतर 4 सप्टेंबर रोजी FAU-G गेमची घोषणा करण्यात आली होती. FAU-G गेम आत्मनिर्भर भारतचा भाग असल्याचं विशाल गोंडल यांनी सांगितलं.
On the auspicious occasion of Gurupurab, we are starting the pre-registrations of FAU-G: Fearless And United Guards.
Pre-register and be the first to play the game. #FAUG #BeFearless Pre-registration link: https://t.co/4TXd1F7g7J@VishalGondal @akshaykumar #happygurupurab — nCORE Games (@nCore_games) November 30, 2020
दरम्यान, PUBG Mobile गेम अनेक प्रयत्नांनंतर भारतात वापसी करणार आहे. याबाबत PUBG कॉर्पोरेशनकडून ऑफिशियल स्टेटमेंटही जारी करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pubg game