दिल्लीतील करोल बाग मार्केटमध्ये सेकंड हँड मारुती वॅगनार केवळ 50 ते 60 हजार रुपयांत खरेदी करू शकता. ही मॉडेल्स 10 वर्षांपर्यंत जुनी असू शकतात. नव्या वॅगनार कारची एक्स-शोरुम किंमत 4.45 लाख रुपयांपासून सुरू आहे. तर ऑन रोड याची किंमत 5.50 लाख रुपयांपर्यंत जाते. परंतु कमी किंमतीत सेकंड हँड कार खरेदी करता येऊ शकते. याशिवाय या मार्केटमध्ये इतरही अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत.
दिल्लीत 15 वर्ष जुन्या कार चालवण्याची परवानगी नाही. त्यामुळे लोक जुन्या गाड्या अतिशय स्वस्तात विक्री करतात. त्यानंतर सेकंड हँड कार डीलर आसपासच्या राज्यात चांगल्या किंमतीत या कार री-सेल करतात. काही राज्यात कार 20 वर्षांपर्यंत चालवण्याची परवानगी आहे. सुरुवातीला RTO कडून कारचं रजिस्ट्रेशन 15 वर्षांचं असायचं. त्यानंतर कारची स्थिती पाहता 5 वर्षांसाठी ते रिन्यू केलं जाऊ शकतं.
दिल्लीत सेकंड हँड कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर येथे कार फायनान्स करण्याची सुविधाही मिळेल. यासाठी सेकंड हँड कार मार्केटमध्ये डीलरशी संपर्क करावा लागेल आणि आवश्यक काही कागदपत्र द्यावी लागतील. त्यानंतर कार डीलर सेकंड हँड कारसाठी फायनान्स करू शकतील.
ज्यावेळी सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी जाल, त्यावेळी कारच्या किंमतीचं योग्य ते मोलभाव करा. कारचं इंटिरीयर आणि एक्सटीरियरची तपासणी करा. त्याशिवाय कारची कमीत-कमी 50 किलोमीटरपर्यंत टेस्ट ड्राईव्ह करा. यामुळे कारच्या इंजिनचीही माहिती मिळेल.