Home /News /technology /

4 कोटींची कार खरेदी करण्यासाठी 1 वर्ष वाट पाहिली, डिलिव्हरीच्या केवळ 6 तासांत चक्काचूर झाली

4 कोटींची कार खरेदी करण्यासाठी 1 वर्ष वाट पाहिली, डिलिव्हरीच्या केवळ 6 तासांत चक्काचूर झाली

गाडी घेतल्यानंतरचा आनंद गगनात मावेनासा असतो. परंतु एका व्यक्तीसाठी ही वाट पाहणं अतिशय दुर्दैवी ठरलं आहे. कारची डिलिव्हरी झाल्याच्या केवळ 6 तासांमध्ये एका व्यक्तीची गाडी क्रॅश झाल्याची घटना घडली आहे.

  नवी दिल्ली, 26 मार्च : आपली स्वत:ची कार खरेदी करणं अनेकांचं मोठं स्वप्न असतं. अनेक जण आपली स्वत:ची कार खरेदी करण्यासाठी बरीच वाट पाहतात. गाडी घेतल्यानंतरचा हा आनंद गगनात मावेनासा असतो. परंतु एका व्यक्तीसाठी ही वाट पाहणं अतिशय दुर्दैवी ठरलं आहे. कारची डिलिव्हरी झाल्याच्या केवळ 6 तासांमध्ये एका व्यक्तीची गाडी क्रॅश झाल्याची घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपली ब्रँड न्यू फेरारी F8 Tributo खरेदी करण्यासाठी कित्येक महिने वाट पाहिली. परंतु गाडी घेतल्यानंतर त्याने गाडी केवळ सहा तासातच क्रॅश केली. या क्रॅशमध्ये गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला. 43 वर्षीय व्यक्तीने आपल्या 4 कोटी फेरारी F8 Tributo ला ठोकलं, त्यामुळे या इटालियन कारचा फ्रंट लूक पूर्णपणे खराब झाला आहे. लोकल मीडिया रिपोर्ट्सनुसार, फेरारीला समर टायर्सच्या मदतीने चालवलं जात होतं आणि ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी गाडी अतिशय वेगात चालवली जात होती.

  (वाचा - हायवेवर आपात्कालीन परिस्थितीसह नेटवर्कचीही समस्या आहे? जाणून घ्या सोपा उपाय)

  हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी चौकशीत सांगितलं कि, फेरारी एका काँक्रिट बॅरियरशी आदळली आणि मागचं चाक पूर्णपणे मागे गेल्याने रस्त्याच्याकडेला फेरारी उडवली गेली. एवढंच नाही, तर गाडी एका छोट्या बसलाही धडकली, त्यामुळे आणखी नुकसान झालं. क्रॅश झाल्यानंतर गाडीचा फ्रंट एंड पूर्णपणे खराब झाला आहे. गाडीचं सस्पेंशन, फ्रंट क्वॉर्टर पॅनलही पूर्णपणे वाकलं आहे. या अपघातात फेरारी चालकाला अधिक दुखापत झालेली नाही, परंतु पॅसेंजर सीटवर बसलेला व्यक्ती जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

  (वाचा - या ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन केल्यास होणार 1 वर्ष जेल,भरावा लागेल 10000 रुपये दंड)

  दरम्यान, Ferrari F8 Tributo मध्ये 3.9 लिटर ट्विन टर्बो V8 इंजिन देण्यात आलं आहे, जे 710 हॉर्सपॉवरचं आहे. यात 3.9 लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन मिळतं, जे 730PS पॉवर आणि 770 Nm चा टॉर्क जेनरेट करतं. Ferrari F8 Tributo कार केवळ 2.9 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर ताशी वेग धरु शकते आणि 7.8 सेकंदात ही 200 किलोमीटर ताशी वेगाने धावते. या कारचा टॉप-स्पीड 340 किलोमीटर ताशी आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Car, Car crash, Heartbreaking, Private bus, Road accident, Tech news

  पुढील बातम्या