• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • नवा फोन घेताय? 30 सप्टेंबरला लाँच होणार Vivo चे 3 स्मार्टफोन, 50MP कॅमेरासह मिळतील जबरदस्त फीचर्स

नवा फोन घेताय? 30 सप्टेंबरला लाँच होणार Vivo चे 3 स्मार्टफोन, 50MP कॅमेरासह मिळतील जबरदस्त फीचर्स

Vivo X70 Series या नव्या सीरिजचे स्मार्टफोन्स 30 सप्टेंबर रोजी भारतात लाँच होणार असल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने X70 (Vivo X70 Series) या आपल्या नव्या सीरिजचे स्मार्टफोन्स भारतात लाँच करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच ही सीरिज चीनमध्ये लाँच करण्यात आली होती. आता या नव्या सीरिजचे स्मार्टफोन्स 30 सप्टेंबर रोजी भारतात लाँच होणार असल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे. विवोने X70 Pro+ 5G या स्मार्टफोनच्या लाँचिंगचे डिटेल्स दिले आहेत. Vivo X सीरिजप्रमाणेच आगामी फोन्सही मोबाईल फोटोग्राफीला डोळ्यांसमोर ठेवून विकसित करण्यात आले आहेत. Vivo X70 सीरिजचे कॅमेरे Zeiss सह असतील आणि फोनवर ‘Zeiss T’ हे स्पेशल कोटिंग असेल.

नवा फोन घेताय? 8 हजारहून कमी किमतीत मिळतोय 48MP कॅमेरा असणारा जबरदस्त स्मार्टफोन

Vivo X70, X70 Pro फीचर्स - Vivo X70 आणि X70 Pro या मॉडेल्समध्ये 6.56 इंची AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये मीडियाटेक डायमेंशन 1200 प्रोसेसर देण्यात आला आहे. 8GB+128GB आणि 12GB+256GB अशा दोन स्टोरेज वेरिएंटमध्ये फोन उपलब्ध आहे. हे फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतात. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Vivo X70 या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. त्यात 40 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 12 मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा देण्यात आला आहे. Vivo X70 Pro या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा असून, त्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 12 मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा देण्यात आला आहे.

स्वस्तात खरेदी करा 64MP सह 4 कॅमेरा असणारा Xiaomi चा हा जबरदस्त स्मार्टफोन

Vivo X70 Pro+ चे फीचर्स - Vivo X70 Pro+ या स्मार्टफोनला 6.78 इंची क्वाड HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर देण्यात आला असून, तो Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. Vivo X70 Pro+ हा फोन 8 GB रॅम आणि 256 GB इंटर्नल स्टोरेज आणि 12 GB रॅम व 256 GB इंटर्नल स्टोरेज अशा दोन वेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. त्यात 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 48 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 12 मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा यांचा समावेश आहे. फोनला 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. Vivo X70 Pro+ फोनला 4500mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून, ती 55W फास्ट चार्जिंग, 50W वायरलेस फास्ट चार्जिंग आणि 10W वायरलेस रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते.
First published: