जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / नवा फोन घेताय? 8 हजारहून कमी किमतीत मिळतोय 48MP कॅमेरा असणारा जबरदस्त स्मार्टफोन

नवा फोन घेताय? 8 हजारहून कमी किमतीत मिळतोय 48MP कॅमेरा असणारा जबरदस्त स्मार्टफोन

नवा फोन घेताय? 8 हजारहून कमी किमतीत मिळतोय 48MP कॅमेरा असणारा जबरदस्त स्मार्टफोन

सध्या Amazon Smartphone Upgrade Days Sale) सुरू आहे. टेक्नो स्पार्क 7T (Techno Spark 7T) या स्मार्टफोनचं फायदेशीर डील या सेलमध्ये आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. तुम्ही नवा स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट फार जास्त नसेल तर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. सध्या अॅमेझॉन स्मार्टफोन अपग्रेड डेज सेल (Amazon Smartphone Upgrade Days Sale) सुरू आहे. या सेलचा आज (11 सप्टेंबर) दुसरा दिवस आहे. या सेलमध्ये ग्राहकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आणि कमीत कमी किमतीपासून प्रीमिअम फोन्सपर्यंत सर्व प्रकारचे फोन्स उपलब्ध आहेत. यात बजेटमध्ये असलेल्या (Budget Smartphones) कमीत कमी आठ हजार रुपयांपासूनही उत्तम फीचर्स असलेले स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. टेक्नो स्पार्क 7T (Techno Spark 7T) या स्मार्टफोनचं फायदेशीर डील या सेलमध्ये आहे. या फोनची किंमत 9499 रुपये आहे, पण हा फोन या सेलमध्ये केवळ 8189 रुपयांना उपलब्ध आहे. तसंच, यावर मिळणाऱ्या कुपन्सच्या रूपाने आणखी 400 रुपयांची सवलतही मिळणार आहे. या फोनची बॅटरी 6000 mAh क्षमतेची आहे आणि 48 मेगापिक्सेल AI ड्युएल कॅमेराही या फोनमध्ये आहे. टेक्नो स्पार्क या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.5 इंची HD+ आहे. त्याचं रिझॉल्युशन 720×1600 पिक्सेल आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 20:9 आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशो 90.34% आहे. या फोनला वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले डिझाइन असून, थिक बेजल्सही आहेत. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर आधारित HiOS 7.6 या ऑपरेटिंग सिस्टमवर (Operating System) काम करतो. या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G35 चिपसेट असून, त्यात हायपर इंजिन टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

    4 कॅमेरे, जबरदस्त बॅटरीसह वॉटरप्रुफ Vivo Smartphone लाँच, पाहा काय आहे किंमत

    कंपनीने हा फोन तीन रंगांमध्ये उपलब्ध केला आहे. या फोनच्या मागच्या बाजूला फ्लॅशसह ड्युएल कॅमेरा सेटअप (Dual Camera Setup) देण्यात आला आहे. त्यात 48 मेगापिक्सेलच्या प्रायमरी सेन्सरसह एक AI लेन्सही समाविष्ट आहे. सेल्फीसाठी या फोनला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

    फोनवर Screen Guard चा चुकीचा वापर ठरेल नुकसानकारक, ही चूक अजिबात करू नका

    या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य म्हणजे याची दमदार बॅटरी (Powerful Battery). या फोनला 6000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा असा दावा आहे, की एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही बॅटरी 36 दिवसांपर्यंत स्टँडबाय राहू शकते. 41 तासांपर्यंत कॉलिंग टाइम, 18 तासांपर्यंत वेब ब्राउझिंग आणि 29 तासांपर्यंत व्हिडीओ प्लेबॅकही ही बॅटरी देते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात