नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : Xiaomi चे स्मार्टफोन जबरदस्त कॅमेरा आणि बॅटरीसाठी पॉप्युलर आहे. जर तुम्ही नवा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. शाओमीच्या Redmi Note 10s फोन चांगल्या डीलमध्ये खरेदी करता येईल. mi.com वर मिळालेल्या माहितीनुसार, Redmi Note 10s वर ऑफर दिली जात आहे. हा फोन केवळ 13,999 रुपयांच्या सुरुवाती किंमतीत उपलब्ध केला जात आहे. ग्राहक हा फोन 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटमध्ये खरेदी करता येईल.
तसंच, ग्राहकांनी HDFC बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास, त्यावर 1000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जाईल.
Redmi Note 10s स्पेसिफिकेशन्स -
- 6.43 इंची एचडी+ AMOLDED डिस्प्ले
- 1,080×2,400 पिक्सल स्क्रीन रेजोलूशन
- प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3
- MIUI 12.5 अँड्रॉईड 11
- 2.05 गीगाहर्ट्ज मीडियाटेक हेलियो G95 प्रोसेसर
- ARM Mali-G76 MC4 जीपीयू
- 5,000mAh बॅटरी
- 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट
- साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर
क्वाड कॅमेरा सेटअप -
या फोनला 64 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल, 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
दरम्यान, शाओमी या आघाडीच्या मोबाइल कंपनीने बुधवारी (15 सप्टेंबर) एका ग्लोबल इव्हेंटमध्ये Xiaomi 11 T आणि Xiaomi 11 T Pro हे दोन नवे स्मार्टफोन लॉंच केले. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 108 MP प्रायमरी कॅमेरा आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. या इव्हेंटमध्ये कंपनीनं शाओमी 11 लाइट 5G NE हा स्मार्टफोनही लॉंच केला असून, भारतात या फोनचं लॉंचिंग कधी होणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Xiaomi, Xiaomi redmi