मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Diwali Offer! केवळ 101 रुपयांत खरेदी करा Vivo Smartphone, पाहा कंपनीची भन्नाट ऑफर

Diwali Offer! केवळ 101 रुपयांत खरेदी करा Vivo Smartphone, पाहा कंपनीची भन्नाट ऑफर

चीनची स्मार्टफोन कंपनी Vivo ने केवळ 101 रुपयात स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी दिली आहे. 101 रुपये देऊन Vivo चा कोणताही स्मार्टफोन खरेदी करता येईल.

चीनची स्मार्टफोन कंपनी Vivo ने केवळ 101 रुपयात स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी दिली आहे. 101 रुपये देऊन Vivo चा कोणताही स्मार्टफोन खरेदी करता येईल.

चीनची स्मार्टफोन कंपनी Vivo ने केवळ 101 रुपयात स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी दिली आहे. 101 रुपये देऊन Vivo चा कोणताही स्मार्टफोन खरेदी करता येईल.

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : दिवाळीच्या फेस्टिव्ह सीजनमध्ये स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. चीनची स्मार्टफोन कंपनी Vivo ने केवळ 101 रुपयात स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी दिली आहे. 101 रुपये देऊन Vivo चा कोणताही स्मार्टफोन खरेदी करता येईल.

दिवाळी ऑफरअंतर्गत Vivo चा कोणताही स्मार्टफोन 101 रुपयांत खरेदी करता येईल, त्यानंतर उरलेली रक्कम हप्त्यांमध्ये देता येईल. या ऑफरचा लाभ कंपनीच्या रिटेल पार्टनर्ससह ऑनलाइन स्टोरवरही घेता येईल.

Vivo ने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांनी Vivo X70 सीरीज, Y73, Y33s सह 15000 रुपयांहून अधिक किंमतीचा कोणताही स्मार्टफोन बजाज फायनान्सद्वारे खरेदी केल्यास, त्यांना 101 रुपये डाउन पेमेंट करावं लागेल. म्हणजेच ग्राहक 101 रुपये देऊन नव्या स्मार्टफोन खरेदी करू शकतात. त्याशिवाय सिटी बैंक, ICICI बैंक, कोटक महिंद्रा बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10 टक्के डिस्काउंट मिळेल.

1 नोव्हेंबरपासून या Smartphone मध्ये WhatsApp सपोर्ट करणार नाही, लगेच घ्या बॅकअप

Vivo X70 Pro किंमत -

Vivo X70 Pro च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 46,990 रुपये आहे. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 49,990 रुपये आहे. टॉप-ऑफ-द-लाइन मॉडेलमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. याची किंमत 52,990 रुपये आहे.

तुमच्या Smartphone सोबत तुम्ही नकळत 100 हून अधिक वेळा करता ही एक गोष्ट

Vivo X70 Pro फीचर्स -

Vivo X70 Pro मध्ये 6.56 इंची फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 44W फ्लॅशचार्ज फास्ट चार्जिंग, 4450mAh बॅटरीसह येतो. फोनला मीडियाटेक डायमेंशन 1200 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसंच Android 11 वर आधारित फनटच OS 12 देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनला चार कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 12 मेगापिक्सलचे दोन सेंसर, 8 मेगापिक्सल क्वॉड कॅमेरा सेटअप आणि 50 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर आहे. सेल्फीसाठी स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सल फ्रंट सेंसर देण्यात आला आहे.

First published:

Tags: Smartphone, Vivo