नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : फेसबुकचा (Facebook) इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म (Instant Messaging Platform) असलेलं व्हॉट्सअॅप (WhatsApp)आता लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. वापरण्यासाठी सहज, सोपं आणि नवनवीन फीचर्स यामुळे जगभरात व्हॉट्सअॅप पॉप्युलर आहे. व्हॉट्सअॅपवर अनेक नवे फीचर्स येत असतात. मात्र अनेकदा हे नवीन फीचर्स चालण्यासाठी आपल्या स्मार्टफोनमधील (Smartphone) ऑपरेटिंग सिस्टम सक्षम नसते. त्यामुळे अनेकदा ज्या युजर्सकडे जुने ऑपरेटिंग सिस्टम असलेले मोबाईल फोन असतील त्यांना फीचर्सचे अपडेट उशिरा मिळतात किंवा मिळतच नाहीत. आता 1 नोव्हेंबरपासून, WhatsApp फक्त Android 4.1 किंवा त्यावरील आणि iOS 10 किंवा त्यावरील ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. या शिवाय अन्य ऑपरेटिंग सिस्टमवर व्हॉट्सअॅप चालणार नाही. 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 नंतर अशा जुन्या ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या फोनमधील व्हॉट्सअॅप बंद होऊ शकतं किंवा त्याला एक दिवस लागू शकतो.
तुम्हाला आपल्या फोनमधील व्हॉट्सअॅप बंद पडू नये असं वाटत असेल, तर आपला स्मार्टफोन खाली दिलेल्या यादीत नाही याची खात्री करणं तसंच तुमच्या फोनमधील ऑपरेटिंग सिस्टमचं अपडेट तपासणं आवश्यक आहे. फोनचा बॅकअपही घेऊन ठेवणं आवश्यक आहे.
फोनमधील ऑपरेटिंग सिस्टमचं Version ((Operating System Version) तपासण्याकरता आधी फोनच्या सेटिंग्जमध्ये (Settings) जा. नंतर About Phone ऑप्शनवर जा. खाली स्क्रोल करा आणि अँड्रॉइड Version (Android Version) तपासा. ती Android 4.1 पेक्षा कमी असेल, तर तुम्हाला नवीन फोन घ्यावा (New Phone) लागेल. ज्यात स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टम Version 4.1 किंवा त्यापेक्षा वरची असावी लागेल.
तुमच्या फोनमध्ये ऑपरेटिंग सिस्टम अपडेट (Update) करण्याची सोय असेल आणि आतापर्यंत फोन अपडेट केलेला नसेल तर तो अपडेट करा. त्यामुळे तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टमचं Version कळेल. फोनच्या सेटिंगमध्ये जाऊनही हे करता येईल. हे करताना बॅटरी 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होत असल्याची खात्री करा आणि अपडेट प्रक्रियेदरम्यान फोनचं बटण दाबू नका.
iPhone फोन वापरणाऱ्यांनादेखील सेटिंगमध्ये जाऊन iOS Version शोधता येईल. यासाठी सेटिंग्जमध्ये जनरल ऑप्शनमधून सॉफ्टवेअर अपडेट (Software Update) वर जा. तिथे तुमच्या फोनमधील सध्याचं आयओएस Version कोणतं आहे ते कळेल. अपडेटची सुविधा असल्यास अपडेट करा. मात्र तुमच्या फोनमधील iOS Version iOS 10 किंवा त्यापेक्षा कमी असल्यास, तुम्हाला नवीन फोन खरेदी करावा लागेल.
या स्मार्टफोन्समधील व्हॉट्सअॅप होईल बंद -
1 नोव्हेंबरपासून ज्या स्मार्टफोनमधील व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. त्याची यादी बरीच मोठी आहे. या यादीत जवळपास 150 स्मार्टफोनचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये iPhone तसंच Samsung, LG, ZTE, Micromax सह अनेक कंपन्यांच्या Android Smartphone चा समावेश आहे. 2014 मध्ये हे फोन दाखल झाले आहेत.
कंपनीने भविष्यकाळाचा विचार करून, पुढील 7 वर्षांसाठीची योजना आखली आहे. ज्या ऑपरेटिंग सिस्टिमच्या युजर्सची संख्या सर्वाधिक आहे, त्याच ऑपरेटिंग सिस्टमवर कंपनी लक्ष केंद्रित करणार आहे. जुने स्मार्टफोन आगामी काळातील व्हॉट्सअॅप फीचर्ससाठी अनकूल ठरणार नाहीत. यामुळे युजर्सच्या प्रायव्हसीला धोकाही वाढेल. त्यामुळे व्हॉट्सअॅपच्या सर्वोत्तम अनुभवासाठी सुसंगत आणि नवीन अद्यावत ऑपरेटिंग सिस्टम असलेले स्मार्टफोन असणं गरजेचं आहे, अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
व्हॉट्सअॅप बंद होणार असल्याच्या फोन्सच्या मॉडेलची यादी -
Apple मॉडेल्स : iPhone SE, iPhone 6S, iPhone 6S Plus
Samsung मॉडेल : Galaxy Trend II, Galaxy SII, Galaxy S3 mini, Galaxy Xcover 2, Galaxy Core आणि Galaxy Ace 2.
LG मॉडेल्स : ल्युसिड 2, ऑप्टिमस F7, ऑप्टिमस F5, Optimus L3 II Dual, Optimus L5, Optimus L5 II, Optimus L5 Dual, Optimus L3 II, Optimus L7, Optimus L7 II Dual, Optimus L7 II, Optimus F6 Enact, Optimus L4 II Dual, Optimus F3, Optimus L4 II, Optimus L2 II, Optimus Nitro HD आणि 4X HD, Optimus F3Q
ZTE मॉडेल्स : ZTE Grand S Flex, ZTE V956, Grand X Quad V987, Grand Memo
Huwai मॉडेल्स : Ascend G740, Ascend Mate, Ascend D Quad XL, Ascend D1 Quad XL, Ascend P1 S, Ascend D2
Sony मॉडेल्स : Xperia Miro, Sony Xperia Neo L, Xperia Arc S
याशिवाय Alcatel One Touch Evo 7, Archos 53 Platinum, HTC Desire 500, Lenovo A820 अशा फोन्समधील व्हॉट्सअॅप बंद होणार आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या यादीत तुमचा फोन नसेल तरीही, तुम्ही व्हॉट्सअॅपचा बॅकअप घेणं (Backup)आवश्यक आहे. कारण व्हॉट्सअॅप बंद झालं, तर तुम्हाला बॅकअपही घेता येणार नाही. मीडिया फाइल्ससह एक्स्पोर्ट करताना तुम्ही 10,000 नवीन मेसेजेसचा बॅकअप घेऊ शकता. तर मीडिया फाइल्सशिवाय 40,000 मेसेजेसचा बॅकअप घेऊ शकता. ईमेलचा आकार मोठा असल्याने ही मर्यादा घालण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.