• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • OLA Scooter : ओला कंपनीनं केलं इलेक्ट्रि्क हायपर चार्जर लॉन्च; आता स्कूटरला 18 मिनिटांत करा चार्ज

OLA Scooter : ओला कंपनीनं केलं इलेक्ट्रि्क हायपर चार्जर लॉन्च; आता स्कूटरला 18 मिनिटांत करा चार्ज

वाहनक्षेत्रात पदार्पण करणाऱ्या ओला कंपनीनं इलेक्ट्रॉनिक स्कूटर लॉन्च केल्यानंतर आता या इलेक्ट्रॉनिक स्कूटरसाठी पहिल्या हायपर (Ola launches electric hyper charger) चार्जर S1 ची घोषणा केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : वाहनक्षेत्रात पदार्पण करणाऱ्या ओला कंपनीनं इलेक्ट्रॉनिक स्कूटर लॉन्च केल्यानंतर आता या इलेक्ट्रॉनिक स्कूटरसाठी पहिल्या हायपर (Ola launches electric hyper charger) चार्जर S1 ची घोषणा केली आहे. याची घोषणा कंपनीचे CEO भाविश अग्रवाल यांनी फोटो शेयर करत केली आहे. त्यामुळं आता इलेक्ट्रिक स्कूटर (Ola company) खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. कंपनीचे CEO भाविश अग्रवाल यांनी याचे फोटो शेयर करताना लिहिलंय की आता आम्ही ओला स्कूटरसाठी S1 हायपर चार्जर लॉन्च करत आहोत. त्यामुळं आता ग्राहकांना या चार्जरमुळं केवळ 18 मिनीटांत आपल्या इ-स्कूटरची चार्जिंग ही 50 टक्यांपैकी करता येणार आहे. त्यासाठी आता भारतातल्या 400 शहरांमध्ये 1 लाख ठिकाणी चार्जर पॉइन्ट तयार करण्यात येणार आहे. Jio दिवाळीआधी देणार मोठं गिफ्ट; लाँच होणार जगातील सर्वात स्वस्त Smartphone त्यामुळं आता या हायपर इलेक्ट्रिक चार्जरमुळं इ- स्कूटरला 18 मिनिटांत चार्ज (scooter charged in 18 minutes) करता येईल. त्याचबरोबर स्कूटरचा वेग हा 75 KMPH पर्यंत वाढवता येणार आहे. कंपनीनं ज्या शहरांमध्ये चार्जर लावण्यात येणार आहे, त्या शहरांचीही लिस्ट कंपनीनं जाहिर केली आहे. Smart Phone Problem : गूगल पिक्सलचा हा स्मार्टफोन निघाला 'चायनीज माल' त्यामुळं आता या चार्जरमुळं आणि चार्जर पॉइन्ट्समुळं ग्राहकांना फायदा होणार आहे. या पहिल्या हायपर चार्जर ची टेस्ट काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. ओला S1 ची किंमत 1 लाख रूपये असणार आहे. एकदा या चार्जरने स्कूटरला चार्ज केल्यानंतर स्कूटर 120 किलोमीटर पेक्षा जास्त मायलेज देईल.
  Published by:Atik Shaikh
  First published: