मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Apple Vs Facebook : ऑपरेटिंग सिस्टम iOS14 वरून Apple आणि Facebook भिडले; काय आहे प्रकरण

Apple Vs Facebook : ऑपरेटिंग सिस्टम iOS14 वरून Apple आणि Facebook भिडले; काय आहे प्रकरण

अ‍ॅपल कंपनीने काही दिवसांपूर्वी आपल्या स्मार्टफोन्समध्ये ऑपरेटिंग सिस्टम iOS14 चं अपडेट जारी केलं होतं. त्यानंतर आता त्या अपडेटवरून अ‍ॅपल आणि फेसबुकमध्ये वाद सुरू झाले आहेत.

अ‍ॅपल कंपनीने काही दिवसांपूर्वी आपल्या स्मार्टफोन्समध्ये ऑपरेटिंग सिस्टम iOS14 चं अपडेट जारी केलं होतं. त्यानंतर आता त्या अपडेटवरून अ‍ॅपल आणि फेसबुकमध्ये वाद सुरू झाले आहेत.

अ‍ॅपल कंपनीने काही दिवसांपूर्वी आपल्या स्मार्टफोन्समध्ये ऑपरेटिंग सिस्टम iOS14 चं अपडेट जारी केलं होतं. त्यानंतर आता त्या अपडेटवरून अ‍ॅपल आणि फेसबुकमध्ये वाद सुरू झाले आहेत.

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : अ‍ॅपल कंपनीने काही दिवसांपूर्वी आपल्या स्मार्टफोन्समध्ये ऑपरेटिंग सिस्टम iOS14 चं अपडेट जारी केलं होतं. त्यानंतर आता त्या अपडेटवरून अ‍ॅपल आणि फेसबुकमध्ये वाद सुरू झाले आहेत. या अपडेटमुळं फेसबुकच्या (Apples ad blocking feature hurts Facebook) पेजेसवर देण्यात येणाऱ्या जाहिरातींवर त्याचा परिणाम होत असल्याची तक्रार फेसबुकने केली आहे. तर फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मचा वापर करून यूजर्सच्या डाटा चोरून आणि त्याद्वारे टार्गेटेड ऑडियन्स तयार करत असल्याचा आरोप अ‍ॅपलने फेसबुकवर (reducing traffic by 80 percent on Facebook) केला आहे. त्यामुळं या या कारणांमुळं मार्केटमधील या दोन कंपन्यांमध्ये वाद पेटला आहे. या वादाचं खरं कारण हे अ‍ॅपलने लॉन्च केलेलं iOS14 हे अपडेट असल्याचं बोललं जात आहे.

कोणालाही समजू न देता पाहता येईल Instagram Story, ही सोपी ट्रिक ठरेल फायदेशीर

काही दिवसांपूर्वीच अ‍ॅपलचे संस्थापक टिम कुक यांनी अ‍ॅपल स्मार्टफोन्ससाठी iOS14 हे अपडेट लॉन्च केलं होतं. या फीचर्सच्या माध्यमातून यूजर्सला नको असलेल्या जाहिराती कायमस्वरूपी ब्लॉक करता येतात. त्यामुळं अ‍ॅपलमध्ये फेसबुक जाहिराती देऊ शकत नव्हतं. यासंदर्भात फेसबुकने यावर लिहिलेल्या ब्लॉगमध्ये लिहिलंय की अ‍ॅपलच्या iOS14 अपडेटनुसारच फेसबुक जाहिराती देत आहे. परंतु त्यातून त्या जाहिराती यूजर्सपर्यंत पोहचत नाहीये. त्यानंतर त्या जाहिराती (Apple Vs Facebook ) ब्लॉक करण्याचा ऑप्शन दिल्यामुळं यावर फेसबुकने आपत्ती दर्शवली आहे.

तुमच्या आधार कार्डसोबत किती नंबर आहेत लिंक; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

यासंदर्भात फेसबुकचे परफॉर्मंस मार्केटर हारून पॉल यांनी CNBC शी बोलताना म्हटलंय की कंपनीच्या बजेटमध्ये सतत बदल होत असून आम्ही फेसबुकवर प्रतिदिवस लाखो डॉलर खर्च करत आहोत. त्यामुळं आता या प्रकरणामुळं फेसबुकची 80% ट्रॅफिक थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता फेस्टिवल सीजनमध्ये फेसबुकचा व्यवसाय कमी होत आहे.

First published:
top videos

    Tags: Advertisement, Apple, Facebook