नवी दिल्ली, 14 जुलै : कोरोना काळात एकीकडे डिजीटल व्यवहारात (Digital Transaction) वाढ झाली असताना, दुसरीकडे ऑनलाईन फ्रॉडच्या (Online Fraud) संख्येतही मोठी वाढ झाली आहे. फ्रॉडची वाढती प्रकरणं पाहता, अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांसाठी बनावट लिंक (Fake Link), मेसेजपासून (Fake Message Link) सावधानतेचा इशारा दिला आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) बँकेनेही ग्राहकांना याबाबत अलर्ट केलं आहे.
सायबर फ्रॉड लोकांची KYC अपडेटच्या नावाखाली फसवणूक करत आहेत. त्यामुळे कोणत्याही KYC अपडेटच्या नावाखाली मेसेजमध्ये आलेल्या लिंकवर क्लिक न करण्याचं आवाहन बँकेकडून करण्यात आलं आहे. फ्रॉडस्टर्स ग्राहकांचे पर्सनल डिटेल्स मिळवण्यासाठी बँकेचे कर्मचारी बनून, बँकेचे कर्मचारी असल्याचं सांगून कॉल किंवा मेसेज करतात. मेसेजमध्ये लिंक दिली जाते. त्यावर क्लिक केल्यानंतर ग्राहकांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.
KYC fraud is real, and it has proliferated across the country. The fraudster sends a text message pretending to be a bank/company representative to get your personal details. Report such cybercrimes here: https://t.co/3Dh42iwLvh#StateBankOfIndia #CyberCrime #StaySafeStayVigilant pic.twitter.com/eVVFAnMgTN
— State Bank of India (@TheOfficialSBI) July 12, 2021
परंतु आता अशा फ्रॉडबबात ग्राहक http://cybercrime.gov.in यावर तक्रार करू शकतात. गृह मंत्रालयानेही KYC फ्रॉडबाबत अकाउंट होल्डर्सला अलर्ट केलं आहे. KYC अर्थात Know Your Customers. बँकेकडून हे स्पष्ट केलं जातं, की त्यांचे ग्राहक आहेत. ही अतिशय आवश्यक स्टेप आहे. त्यामुळे बँका, इतर फायनेंशियल संस्थांमध्ये ग्राहकांच KYC अपडेट करणं अत्यावश्यक आहे. बँकांच्या याच महत्त्वाच्या स्टेपचा फायदा फ्रॉडस्टर्सकडून घेतला जात आहे.
जुना फोन विकण्याआधी किंवा Exchangeकरण्यापूर्वी ही 3 कामं कराच;अन्यथा येईल समस्या
कोणत्याही बँका, फायनेंशियल संस्था, टेलिकॉम कंपन्या ग्राहकांची कोणतीही खासगी माहिती अकाउंट नंबर, आधार नंबर, पॅन कार्ड नंबर अशी माहिती मागत नाहीत. त्यामुळे कोणीही कॉल करुन किंवा मेसेजमधील लिंकवर क्लिक करुन माहिती भरण्यास सांगत असल्यास सावध व्हा आणि कोणतेही डिटेल्स शेअर करू नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyber crime, Online fraud, Tech news