मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /आता UPI पेमेंट करणं अधिक सोपं होणार, Airtel कडून Pay to Contacts सर्विस लाँच; असा होणार फायदा

आता UPI पेमेंट करणं अधिक सोपं होणार, Airtel कडून Pay to Contacts सर्विस लाँच; असा होणार फायदा

Pay to Contact द्वारे युजर्स मोबाईल फोनमध्ये असलेल्या कॉन्टॅक्ट लिस्टपैकी कोणत्याही नंबरवर पैसे ट्रान्सफर करू शकतील. यासाठी कोणालाही UPI ID आणि बँक अकाउंट नंबर टाकण्याची गरज पडणार नाही.

Pay to Contact द्वारे युजर्स मोबाईल फोनमध्ये असलेल्या कॉन्टॅक्ट लिस्टपैकी कोणत्याही नंबरवर पैसे ट्रान्सफर करू शकतील. यासाठी कोणालाही UPI ID आणि बँक अकाउंट नंबर टाकण्याची गरज पडणार नाही.

Pay to Contact द्वारे युजर्स मोबाईल फोनमध्ये असलेल्या कॉन्टॅक्ट लिस्टपैकी कोणत्याही नंबरवर पैसे ट्रान्सफर करू शकतील. यासाठी कोणालाही UPI ID आणि बँक अकाउंट नंबर टाकण्याची गरज पडणार नाही.

नवी दिल्ली, 9 जुलै : एअरटेल पेमेंट बँकने (Airtel Payment bank) अनेक सर्विसची सुरुवात केली आहे. आता यूपीआय पेमेंट्ससाठी (UPI payments) पे-टू-कॉन्टॅक्ट सेवा (Pay to Contact) एअरटेलकडून सुरू करण्यात आली आहे. याच्या मदतीने युजर्स मोबाईल फोनमध्ये असलेल्या कॉन्टॅक्ट लिस्टपैकी कोणत्याही नंबरवर पैसे ट्रान्सफर करू शकतील. यासाठी कोणालाही UPI ID आणि बँक अकाउंट नंबर टाकण्याची गरज पडणार नाही.

कंपनीकडून देण्यात आलेल्या रिपोर्ट्सनुसार, Pay to Contact सर्विसद्वारे ग्राहकांना अनेक फायदे होतील. कस्टमर्स विना बँक डिटेल्स किंवा UPI ID एंटर न करताच पैसे ट्रान्सफर करू शकतील. यामुळे ग्राहकांचा वेळही वाचेल. युजर्स BHIM UPI सेक्शनमध्ये जाऊन Pay Money - To Contacts वर क्लिक करुन सहजपणे पैसे पाठवू शकतील.

Airtel Pay to Contact चा कसा कराल वापर?

- सर्वात आधी Airtel Payments Bank मध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा.

- इथे मोबाईल नंबर टाका.

- माहिती भरण्यासाठी आधार कार्ड नंबर, Voter ID, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड यापैकी कोणत्याही एकाची निवड करा.

- कोणतंही ID Card रजिस्टर्ड करा.

- त्यानंतर OTP येईल.

- ओटीपी रजिस्टर्ड केल्यानंतर Airtel Account ओपन करा.

(वाचा - चीनमधून भारतात होत होता Online Fraud, सायबर क्राईमचा प्रकार पाहून पोलिसही हैराण)

Airtel Safe Pay -

या वर्षाच्या सुरुवातील Airtel ने आपल्या ग्राहकांसाठी Safe Pay फीचर लाँच केलं होतं. एअरटेलचं हे फीचर डिजीटल पेमेंटच्या बाबतीत अतिशय सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. यात ग्राहकांना एक्स्ट्रा लेअर सिक्योरिटी देण्यात आली आहे. यामुळे बँकिंग फ्रॉड (Banking Fraud), फिशिंग आणि पासवर्ड चोरी सारख्या घटनांपासून वाचता येऊ शकतं.

(वाचा - Cyber Crime पासून बचावासाठी Airtel ची खास सर्विस लाँच;लहान मुलांनाही होणार फायदा)

- Airtel Safe Pay अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी सर्वात आधी Airtel Thanks App वर जा.

- इथे खालच्या बाजूला Banking Section वर क्लिक करा. त्यानंतर Safe Pay वर क्लिक करा.

- Toggle बटणावर क्लिक केल्यानंतर इनेबल होईल, त्यानंतर Airtel Safe Pay अ‍ॅक्टिव्ह होईल.

First published:
top videos

    Tags: Airtel, Online payments, Tech news