Home /News /technology /

चीनमधून भारतात होत होता Online Fraud, सायबर क्राईमचा हा प्रकार पाहून पोलिसही हैराण

चीनमधून भारतात होत होता Online Fraud, सायबर क्राईमचा हा प्रकार पाहून पोलिसही हैराण

SBI Alert! असे कॉल येत असतील तर सावधान

SBI Alert! असे कॉल येत असतील तर सावधान

चिनी सायबर क्रिमिनल्सनी (Cyber Fraud) आतापर्यंत भारतातील अनेक लोकांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे. याचदरम्यान दिल्ली पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ऑनलाईन टोळीचा पर्दाफाश करत दोघांना अटक केली आहे.

    नवी दिल्ली, 8 जुलै: मागील वर्षी सरकारकडून चीनचे अनेक अ‍ॅप (Chinese App) भारतात बॅन करण्यात आले. भारतीयांचा डेटा चोरी करत असल्यावरुन टिकटॉक, शेअरचॅट यांसारखे अनेक अ‍ॅप, पबजीसारखे गेम बॅन करण्यात आले. आता चीनमध्ये बसून चायनीज फ्रॉडस्टर्सकडून (Chinese Syndicates Gang) भारतात कोट्यवधी रुपयांची फसवणूक (Online Fraud) होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. चिनी सायबर क्रिमिनल्सनी (Cyber Fraud) आतापर्यंत भारतातील अनेक लोकांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे. याचदरम्यान दिल्ली पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ऑनलाईन टोळीचा पर्दाफाश करत दोघांना अटक केली आहे. हैराण करणारी बाब म्हणजे या आरोपींकडून भारतीय सिम कार्डही जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी भारतात बसून बनावट कंपन्या बनवत होते आणि त्यानंतर त्या कंपन्यांच्या नावाने बँकेत करंट अकाउंट ओपन करत होते. अकाउंटमध्ये फ्रॉड करुन जे पैसे येत होते, ते आरोपी क्रिप्टो करेन्सीद्वारे चायनामध्ये बसलेल्या आपल्या प्रमुखांकडे पोहोचवत होते. वर्षभरात स्टार्टअप कंपनीची 100 कोटींची कमाई; तुम्हीही करू शकता हा Online व्यवसाय या कामासाठी मिळत होता गलेलठ्ठ पगार - या दोन आरोपींना या कामासाठी चायनामध्ये बसलेल्या त्यांच्या प्रमुखांकडून मोठा पगार मिळत होता. जो पैसा करंट अकाउंटमधून क्रिप्टो करेन्सीद्वारे चायनामध्ये पाठवला जात होता, त्याचेही काही टक्के त्यांना मिळत होते. आतापर्यंत या आरोपींनी कोट्यवधी रुपये भारतातून क्रिप्टो करेन्सीद्वारे चिनमध्ये पाठवले आहेत. दिल्ली पोलिसांनी आरोपींच्या बँक खात्यातून करोडो रुपये सीज केले आहेत. Online Classमध्ये कपलचं सेक्स; कॅमेरा सुरू राहिल्याने शिक्षकांनी पाहिलं आणि.... असा झाला खुलासा - वरुण नावाच्या एका पीडित व्यक्तीने दिल्ली पोलिसांत आपल्यासोबत फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. पीडित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, डेटिंग अॅप टिंडरवर त्याचं Soo Yeon Park शी बोलणं झालं होतं. त्यानंतर त्या व्यक्तीने 20 टक्के देण्याचं सांगितलं आणि पीडित व्यक्तीने 5000 रुपये गुंतवले. अशाप्रकारे चिनमध्ये बसून फ्रॉड करणारे फ्रॉडस्टर्स भारतातीयांची फसवणूक करत होते. अशा अनेक फ्रॉडमधून कोट्यवधींची रक्कम क्रिप्टो करेन्सीद्वारे भारतातून चायनामध्ये गेले आहेत.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Cyber crime, Online fraud, Tech news

    पुढील बातम्या