नवी दिल्ली, 7 जुलै: देशात वाढत्या सायबर क्राईमची (Cyber Crime) प्रकरणं पाहता एअरटेल एक्सस्ट्रीम फायबरने (Airtel Xstream Fiber) मंगळवारी आपल्या ग्राहकांसाठी नवी सायबर सुरक्षा सर्विस 'सिक्योर इंटरनेट' (Secure Internet) लाँच केली आहे. हे इंटरनेटसह मुलांचे ऑनलाईन क्लास सुरक्षित ठेवण्याचं काम करेल. एअरटेल एक्सस्ट्रीम फायबरची सिक्योर इंटरनेट सर्विस रियल टाईममध्ये मालवेअरला (Malware) मॉनिटर करते.
Secure Internet चा कसा होईल फायदा -
Secure Internet सर्विस ग्राहकांना वेगवेगळ्या गरजांसाठी रिमोट वर्किंगपासून ऑनलाईन क्लासेसपर्यंतच्या अनेक सुरक्षा देते. ज्या वेबसाईट किंवा Apps मुलांच्या वापरासाठी सिक्योर नाहीत, त्या ब्लॉक करण्याचं काम याद्वारे होईल. ही सर्विस Wifi द्वारे Airtel Xstream Fiber शी जोडलेल्या सर्व उपकरणांना सुरक्षा देते.
एअरटेलने दिलेल्या अधिकृत विधानानुसार, वाय-फायच्या माध्यमातून एअरटेल एक्सस्ट्रीम फायबरशी संबंधित सर्व डिव्हाईससाठी एअरटेलच्या नेटवर्क सुरक्षा तंत्राचा फायदा घेता येईल आणि पुढील धोक्यांबाबत ऑनलाईन सुरक्षा दिली जाईल. अशात ब्रॉडब्रँड सुरक्षित असणं गरजेचं आहे.
या सर्विससाठी किती असेल चार्ज -
Airtel Xstream युजर्स दर महिन्याला 99 रुपये देऊन सिक्योर इंटरनेट सर्विसचा वापर करू शकतात. हे सब्सक्रिप्शन 30 दिवसांसाठी फ्री आहे. या सर्विसचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना केवळ Airtel Thanks App ची गरज आहे. या अॅपद्वारे ग्राहक सहजपणे ही सर्विस Activate आणि Deactivate करू शकतात.
भारती एअरटेलचे मुख्य मार्केटिंग ऑफिसर यांनी सांगितलं, की आम्ही एअरटेल आमच्या ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण माध्यमातून चांगला आणि सुरक्षित डिजीटल अनुभव देण्यासाठी तत्पर आहोत. कोरोना काळात कामासह मुलांच्या शाळाही ऑनलाईन झाल्या आहेत. ब्रॉडब्रँड आणि स्पीडच्या विश्वासार्हतेसह सिक्योरिटीही आता प्रमुख गरज आहे. Secure Internet ग्राहकांसाठी सुरक्षित, सक्रिय आणि अतिशय प्रभावी असल्याचं, ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.