मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google अकाउंटशी लिंक आहे नको असलेले apps? 'या' पद्धतीने करा डिलीट!

Google अकाउंटशी लिंक आहे नको असलेले apps? 'या' पद्धतीने करा डिलीट!

थर्ड पार्टी अ‍ॅप्स गुगल अकाउंटशी (Google Account) कनेक्ट असल्याने हॅकिंगचा धोका असतो.

थर्ड पार्टी अ‍ॅप्स गुगल अकाउंटशी (Google Account) कनेक्ट असल्याने हॅकिंगचा धोका असतो.

थर्ड पार्टी अ‍ॅप्स गुगल अकाउंटशी (Google Account) कनेक्ट असल्याने हॅकिंगचा धोका असतो.

    मुंबई, 31 डिसेंबर : सध्याचं युग डिजिटल युग आहे. या डिजिटल युगात स्मार्टफोनने (Smartphone) आपलं आयुष्य अगदी सोपं केलं आहे.  स्मार्टफोनच्या माध्यमातून चुटकीसरशी अनेक कामं ऑनलाइन होतात. ऑनलाइन व्यवहार करणं सोपं आणि वेगवान झालं असून, डिजिटल व्यवहारांचं प्रमाण वाढलं आहे. शॉपिंग, प्रवास आणि सोशल मीडियाशी संबंधित अनेक अ‍ॅप्सचा वापर आपण करतो. यासाठी आपण अनेक ठिकाणी गुगलद्वारे साइन-अप करतो; पण असं करणं सुरक्षित नसून, यामुळे आपलं मोठं नुकसान होऊ शकतं. आपल्या मोबाइलचं हॅकर्सपासून संरक्षण करण्‍यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. थर्ड पार्टी अ‍ॅप्स गुगल अकाउंटशी (Google Account) कनेक्ट असल्याने हॅकिंगचा धोका असतो.

    Google अकाउंट म्हणजेच जीमेल अकाउंट कमीत कमी थर्ड पार्टी अ‍ॅप्सशी जोडलेलं असलं, तर हॅकर्सचा धोका कमी असतो. यासाठी मोबाइलमधून थर्ड पार्टी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस हटवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स (Tech Tips) सांगणार आहोत. या पद्धतीचा वापर करून तुम्ही फोनच्या सेटिंग्जमधून थर्ड पार्टी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस हटवू शकता. 'टीव्ही 9 हिंदी'ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.

    सर्वांत पहिल्यांदा इंटरनेट Android फोनशी कनेक्ट करा. Google suite चा भाग असलेलं Google अ‍ॅप उघडा. यानंतर उजव्या कोपऱ्यात असलेल्या Google अकाउंट या चिन्हावर क्लिक करा. आता तुम्हाला Manage your Google Account हा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा. तिथून सिक्युरिटीमध्ये जा आणि थर्ड पार्टी अ‍ॅप्स अ‍ॅक्सेसवर क्लिक करा. यानंतर तुम्ही Google अकाउंटच्या साह्याने कुठे-कुठे लॉग-इन केले आहे, याची माहिती मिळेल. त्यावर क्लिक करून थर्ड पार्टी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस हटवा.

    (अभिनेत्री Monalisa चे बोल्ड फोटो पाहुन चाहते भडकले, म्हणाले...)

    तुम्ही Android फोन वापरत असाल तर सर्वप्रथम तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जा. सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर Google Account पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा. तिथे तुम्हाला सर्व अ‍ॅप्सची माहिती मिळेल. ज्या अ‍ॅपवरून तुम्हाला Google अ‍ॅक्सेस काढायचा आहे त्यावर क्लिक करा. सिक्युरिटी सेक्शनमध्ये जा आणि अकाउंट अ‍ॅक्सेससह थर्ड पार्टी अ‍ॅप्सवर क्लिक करा. यानंतर मॅनेज थर्ड पार्टी अ‍ॅप अ‍ॅक्सेस या पर्यायावर क्लिक करा. गुगल साइन-अप केलेल्या थर्ड पार्टी अ‍ॅप्सची माहिती तुम्हाला मिळेल. आता ज्या अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस हटवायचा आहे, त्यावर फक्त क्लिक करा.

    (सुधीर मुनगंटीवारांना सोनम कपूर का म्हणाली, 'अशिक्षित...', पोस्ट व्हायरल)

    लॅपटॉप आणि टॅबलेटवरून थर्ड पार्टी अ‍ॅक्सेस काढण्यासाठी पहिल्यांदा तुम्हा वापरत असलेल्या ब्राउझरमध्ये गुगल अकाउंट ओपन करा. अकाउंटच्या उजव्या बाजूला क्लिक करा. आता Manage your Google Account वर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला Security हा पर्याय दिसेल, तो निवडा. येथे तुम्हाला गुगलचा वापर करून लॉग इन केलेल्या अ‍ॅप्सची माहिती मिळेल. ज्या अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस हटवायचा आहे त्यावर क्लिक करा. अगदी ही सोपी पद्धत वापरून तुम्ही आपला फोन सुरक्षित ठेवू शकता.

    First published:

    Tags: Google, Tech news