मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सुधीर मुनगंटीवारांना सोनम कपूर का म्हणाली, 'अशिक्षित...', पोस्ट व्हायरल

सुधीर मुनगंटीवारांना सोनम कपूर का म्हणाली, 'अशिक्षित...', पोस्ट व्हायरल

भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी नुकतेच LGBTQIA समुदायातील सदस्यांना सहभागी करुन घेण्याला विरोध दर्शवत आक्षेपार्ह वक्तव्य केली होती.

भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी नुकतेच LGBTQIA समुदायातील सदस्यांना सहभागी करुन घेण्याला विरोध दर्शवत आक्षेपार्ह वक्तव्य केली होती.

भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी नुकतेच LGBTQIA समुदायातील सदस्यांना सहभागी करुन घेण्याला विरोध दर्शवत आक्षेपार्ह वक्तव्य केली होती.

मुंबई, 30 डिसेंबर-​ भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी नुकतेच LGBTQIA समुदायातील सदस्यांना सहभागी करुन घेण्याला विरोध दर्शवत आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. आता यावर बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने (Sonam Kapoor) देखील प्रतिक्रिया दिली आहे. सोनमने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत सोनमने भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना अडाणी असं म्हटलं आहे. सध्या तिची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

सोनम इन्स्टा पोस्टमध्ये नेमके काय म्हणाली आहे?

सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. य ‘अशिक्षित, दुर्लक्ष करणारं आणि द्वेषपूर्ण’, असे कॅप्शन सोनमने या व्हिडिओला दिलं आहे. सोनमची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

वाचा-BBM3 : दिलेला शब्द पाळला...विशाल निकमने घेतली शिवलीला पाटीलची भेट!

सुधीर मुनगंटीवार नेमके काय म्हणाले होते?

राज्याच्या विधानसभेत 'महाराष्ट्र पब्लिक युनिवर्सिटी अॅक्ट 2016' विधेयकावर चर्चा सुरु असतानाच भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी या स्पष्ट विरोध दर्शवला. LGBTQIA समुदायातील सदस्यांना सहभागी करुन घेण्याला विरोध दर्शवताना त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केली. समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य नियुक्त करता, काही गांभीर्य आहे का, हे विधेयक आहे. अजुन अनैसर्गिक संबंधांची परिभाषाही नाही, कोण सिद्ध करणार हे, काय कायदे करतोय आपण असे अनेक प्रश्न मुनगंटीवार यांनी यावेळी उपस्थित केले.

सोनम कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिंच मत खुलेपणाने मांडत असते. ती जितकी तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते, तितकीच ती तिच्या वक्तव्यामुळे देखील चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये खूप कमी अभिनेत्री आहेत ज्या अशा मोकळेपणाने मत मांडताना दिसतात.

वाचा-

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी करण्यात आलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून त्यांना धारेवर धरण्यात आलं आहे. सोशल मीडियावरही त्यांच्यावर टीका होत आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Sonam Kapoor, Sudhir mungantiwar