Home /News /technology /

Twitter ची मोठी घोषणा; Blue Tick साठी तुम्हीही करू शकता अर्ज, असं करा अप्लाय

Twitter ची मोठी घोषणा; Blue Tick साठी तुम्हीही करू शकता अर्ज, असं करा अप्लाय

कंपनीने यावेळी ट्विटर वेरिफिकेशनसाठी अर्थात ब्लू टिकसाठी अर्ज करण्याची पद्धत बदलली आहे. आता युजर्सला प्रोफाईल सेटिंग्समध्येच हा ऑप्शन मिळेल. वेरिफिकेशनसाठीच्या नियमांत आणि पात्रतेत आता बदल करण्यात आले आहेत.

  नवी दिल्ली, 20 मे : Twitter ने वेरिफिकेशन अ‍ॅप्लिकेशन प्रोसेसची घोषणा केली आहे. ट्विटरने पुन्हा एकदा पब्लिक वेरिफिकेशन सुरू केलं आहे. कंपनीने ही प्रोसेस 16 नोव्हेंबर 2017 रोजी बंद केली होती. तेव्हापासून आतापर्यंत कंपनी स्वत: सिलेक्ट करुन अकाउंट वेरिफाय करत होती किंवा कंपन्यांच्या रिक्वेस्टनंतर अकाउंट वेरिफाय केलं जात होतं. परंतु आता पुन्हा एकदा Blue Tick साठी अर्ज करता येणार आहे. आता ट्विटर युजर्स (Twitter Users) पुन्हा एकदा ट्विटर वेरिफिकेशनसाठी स्वत:हून अर्ज करू शकतात. कंपनीने यावेळी ट्विटर वेरिफिकेशनसाठी अर्थात ब्लू टिकसाठी अर्ज करण्याची पद्धत बदलली आहे. आता युजर्सला प्रोफाईल सेटिंग्समध्येच हा ऑप्शन मिळेल. वेरिफिकेशनसाठीच्या नियमांत आणि पात्रतेत आता बदल करण्यात आले आहेत. Twitter वेरिफिकेशनसाठी पात्रता - - सरकार - कंपन्या, ब्राँड्स आणि ऑर्गेनायझेशन्स - इंटरटेनमेंट - स्पोर्ट्स आणि गेमिंग - अ‍ॅक्टिव्हिस्ट, ऑर्गनायजर्स, इन्फ्लूएन्सिंग इंडिव्हिजुअल्स Twitter ने दिलेल्या माहितीनुसार, वेरिफिकेशन पॉलिसीनुसार, ब्लू टिकसाठी अर्ज करण्यापूर्वी अकाउंट कंप्लिट आहे का, हे तपासा. प्रोफाईल नेम, फोटो आणि ईमेल आयडी किंवा फोन नंबर वेरिफायड असणं गरजेचं आहे. तसंच मागील सहा महिन्यांपासून अकाउंट अ‍ॅक्टिव्ह असणं आवश्यक आहे. तसंच तुमच्या ट्विटमुळे, ट्विटरच्या पॉलिसीचं उल्लंघन झालेलं नाही ना, हे पाहणं देखील गरजेचं आहे. वेरिफिकेशनवेळी सरकारकडून जारी करण्यात आलेला आयडी, ऑफिशियल ईमेल आयडी आणि ऑफिशियल वेबसाईट द्यावी लागेल. वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार लिंक्स द्याव्या लागतील.

  (वाचा - कुणालाही समजू न देता Facebook वर Online राहायचं आहे? वापरा या सोप्या स्टेप्स)

  वेरिफिकेशनसाठी कसा कराल अर्ज? Twitter नुसार, पुढील काही आठवड्यांमध्ये सर्व ट्विटर युजर्सच्या अकाउंट सेटिंग टॅबमध्ये वेरिफिकेशन अ‍ॅप्लिकेशन दिसणं सुरू होईल. यासाठी लिंकवर क्लिक करुन वेरिफिकेशन फॉर्म भरावा लागेल. सध्या Verification Application हा पर्याय दिसत नसेल, तर काही हळू-हळू हा ऑप्शन ट्विटर अकाउंटमध्ये दिसण्यास सुरुवात होईल.

  (वाचा - तु्म्हीही पॉर्न सर्च केलं का? Google ने आता उचललं मोठं पाऊल)

  एकदा अ‍ॅप्लिकेशन सबमिट केल्यानंतर, ट्विटर काही दिवसांमध्ये ईमेलद्वारे रिप्लाय करेल. यासाठी काही आठवडेही लागू शकतात. जर तुमचं अ‍ॅप्लिकेशन अप्रुव्ह झालं, तर तुमच्या प्रोफाईलजवळ ब्लू टिक दिसू लागेल. जर अप्रुव्ह झालं नाही, तर याची माहिती दिली जाईल. अप्रुव्ह न झाल्यास, 30 दिवसांनंतर पुन्हा ट्विटर वेरिफिकेशनसाठी अर्ज करू शकता.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Tech news, Twitter, Twitter account

  पुढील बातम्या