मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Truecaller चं नवं अपडेट, आता Video Caller ID सह मिळतील अनेक नवे फीचर्स

Truecaller चं नवं अपडेट, आता Video Caller ID सह मिळतील अनेक नवे फीचर्स

Truecaller ने आपल्या Caller ID App चं 12 वं वर्जन लाँच केलं आहे. यात सर्वात मोठं अॅडिशन Video Caller ID चं आहे.

Truecaller ने आपल्या Caller ID App चं 12 वं वर्जन लाँच केलं आहे. यात सर्वात मोठं अॅडिशन Video Caller ID चं आहे.

Truecaller ने आपल्या Caller ID App चं 12 वं वर्जन लाँच केलं आहे. यात सर्वात मोठं अॅडिशन Video Caller ID चं आहे.

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : Truecaller ने आपल्या Caller ID App चं 12 वं वर्जन लाँच केलं आहे. Truecaller च्या या वर्जनमध्ये अनेक फीचर्स दिले गेले आहेत. यात सर्वात मोठं अॅडिशन Video Caller ID चं आहे. याद्वारे युजर्स शॉर्ट व्हिडीओ सेट करू शकतात, जो मित्र किंवा कुटुंबियांपैकी एखाद्याचा कॉल आल्यास ऑटोमॅटिकली प्ले होईल.

Truecaller चं नवं वर्जन रिडिझाइन इंटरफेससह आलं आहे. यात कॉल आणि SMS मेसेजसाठी वेगळे टॅब्सही देण्यात आले आहेत. Truecaller ने इनकमिंग आणि आउटगोइंग कॉलसाठी कॉल रेकॉर्डिंग फीचर देखील इंटिग्रेट केलं आहे.

Video Caller ID पासून युजर एक शॉर्ट व्हिडीओ सेट करू शकतात, ज्यात फोनबुक कॉन्टॅक्टमधून कॉल आल्यास, व्हिडीओ प्ले होईल.

Truecaller 12 मध्ये घोस्ट कॉल आणि Call अनाउंस फीचरही देण्यात आलं आहे. परंतु हे फीचर्स पेड युजर्ससाठीच उपलब्ध होतील.

कधीच डाउनलोड करू नका WhatsApp चं हे नकली वर्जन, बॅन होऊ शकतं अकाउंट

Truecaller ने Ghost Call फीचर प्रीमियम युजर्ससाठी जारी केलं आहे. यात युजर्स कोणतंही नाव आणि नंबर सेट करू शकतात. सेट केलेल्या वेळेत त्या कॉन्टॅक्टवर कॉल येईल. प्रीमियम किंवा पेड युजर्ससाठी कंपनी कॉल अनाउंस फीचरही जारी करत आहे. यामुळे मोबाइलमध्ये सेव्ह कॉन्टॅक्ट किंवा Truecaller चा Caller ID डेटाबेस नंबर अनाउंस केला जाईल. हेडफोन घातल्यानंतरही हे इनेबल करता येईल.

Google चं नवं अपडेट, आता तुमचं अकाउंट अधिक सुरक्षित होणार; पाहा प्रोसेस

यासाठी युजर्स व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतात किंवा आधी प्रीलोडेड टेम्पलेटची निवड करू शकतात. Video Caller ID फोनबुक कॉन्टॅक्ट्सशिवाय वेरिफाइड बिजनेस कॉलसाठीही काम करेल. नव्या अपडेटसह कॉल रेकॉर्डिंग फीचर प्रीमियम आणि फ्री दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. यासाठी तुमच्या Android फोनचं वर्जन 5.1 किंवा त्याहून अधिक असणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Tech news, Truecaller